(फोटो सौजन्य – Instagram)
काही महिन्यांपूर्वी लड्डू मुत्त्या हे नाव फार चर्चेत होते. हे बाबा सोशल मीडियावर आपल्या चमत्कारांमुळे फार चर्चेत होते. वास्तविक, हे बाबा आपल्या हातांनी चालू फिरत्या पंख्याला थांबवायचे ज्यामुळे त्यांना इंटरनेटवर फार प्रसिद्धी मिळाली. लड्डू मुत्त्यांचा हा चमत्कार बराच काळ सोशल मीडियावर ट्रेंड करत राहिला. याचे व्हिडिओही व्हायरल झाले त्यातच आता यासंबंधित आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात लड्डू मुत्त्यांप्रमाणे एक महिला हातांनी नाही तर चक्क आपल्या तोंडाने फिरता पंखा थांबवत असल्याचे दिसून आले. महिलेचा हा धोकादायक स्टंट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि काहींना तर हसूही अनावर झाले. आता महिलेने हे सर्व कसे केले ते चला जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक महिला बिछान्यावर उभी राहून चालू पंख्यावर एकटक पाहत असल्याचे दिसून येते. पंखा वेगाने सुरु असतो आणि महिला यावेळी एकटक त्याकडे पाहतच राहते. आता ही महिला असे का करत आहे ते कुणालाही समजत नाही मात्र पुढच्याच क्षणी ती असे काही करते की पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. आपण व्हिडिओत पाहू शकता, महिला पुढच्याच क्षणी चालू पंख्याचा ब्लेड आपल्या तोंडात पकडते आणि क्षणात त्या पंख्याला तोंडात धरत थांबवते. हे सर्व इतके वेगाने घडते की ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. काही सेकंदाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. लोक या व्हिडिओची चांगलीच मजा लुटताना दिसून येत आहेत.
दरम्यान महिलेचा हा व्हायरल व्हिडिओ @davyaaaaaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जर महिलांना हवे असेल तर त्या काहीही करू शकतात!’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता काही हेटर्स बोलतील की हा विडिओ एडिट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “संपूर्ण पंखा समाजात भीतीचे वातावरण आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “रिवर्स केला आहे दीदीने”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.