(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना शेअर केल्या जातात. अनेकदा यातील दृश्ये आपल्या कल्पनेपलीकडची असतात. इथे अपघातांचेही अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील घटना मनाला हेलवणारी आहे. रस्त्यावर गाडी चालवताना चालकांनी विशेष काळजी घ्यावी, रस्ते नियमांचे पालन करावे अशा सूचना वारंवार दिल्या जातात मात्र लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघातांना बळी पडतात. आताही सोशल मीडियावर अशीच घटना घडून आली आहे जिने सर्वांना हादरून सोडले आहे. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्यासोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. यात एका चिमुकल्याला वाईटरित्या एका कारने चिरडल्याचे दृश्य दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक चिमुकला तुम्हाला रस्त्याच्या मधोमध खेळताना दिसून येईल. यावेळी रस्त्याच्या आजीबाजूला बऱ्याच कार पार्क केल्याचे दिसून येते. यावेळी अचानक एक कार भरवेगात तिथे येते आणि क्षणार्धातच त्या चिमुकल्याला चिरडून पुढे जाते. कार त्या मुलाला इतक्या वाईटरित्या चिरडले की पाहून सर्वांचा श्वास थांबतो. मुलाला चिरडल्याचे पाहताच एक व्यक्ती धावत तिथे येतो आणि मुलाला गाडीखालून बाहेर काढतो. या अपघातात मुलाची अवस्था फार वाईट झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक आता कारचालकावर चांगलेच भडकले आहेत. तर काहीजण मुलाच्या पालकांवर आपला संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाळ रस्त्याच्या मधोमध का बसले आहे ?????” तर दुसऱ्या युजरन लिहिले आहे, “मला माहित आहे की ही पालकांची चूक आहे, पण ड्रायव्हर आंधळा आहे का??”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.