मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांमधील संघर्षाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र अनेकदा हेच प्राणी हे व्हिडिओ पाहून आपणही आपली बोटे तोंडात घालतो. कधी कधी हेच प्राणी पर्यटकांच्याही मागे लागतात. पण अशा घटना फारच दुर्मिळ असतात. अशीच एक घटना आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. या घटनेत जंगलात भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांच्या मागे एक गेंडा लागला असून, हे पर्यटक जिवाच्या आकांताने ओरडताना दिसून येत आहेत.
बाल – बाल बचे….!!
शुक्र है गैंडे का मन बदल गया।#ViralVideo of Kaziranga Manas National Park. pic.twitter.com/bLFGBir5sT— sunilkumar singh (@sunilcredible) December 31, 2022
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आसामच्या बक्सा स्थित मानस नॅशनल पार्कमधील आहे. तो तेथील वन कर्मचाऱ्यांनी तयार केला आहे. व्हिडिओत एकशिंगी गेंडा वेगाने पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करताना दिसून येत आहे. हा गेंडा जवळपास 3 किमीपर्यंत पर्यटकांचा पाठलाग करतो. त्यानंतर जंगलाच्या दिशेने आपले पाय वळवतो.
An Angry rhino chasing tourist vehicle at Manas National Park Assam. pic.twitter.com/1SsmsaBGMN
— Nandan Pratim Sharma Bordoloi (@NANDANPRATIM) December 22, 2021
व्हिडिओतील गेंड्याची चाल पाहता तो फारच संतापलेला दिसत आहे. सुदैवाने पर्यटकांची गाडी वेगात पुढे गेल्यामुळे ते वाचले. अन्यथा त्यांनी केलेला आकांत अनेकांच्या मनाचा थरकाप उडवणारा दिसून येत आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना मानस नॅशनल पार्कचे फॉरेस्ट रेंज अधिकारी बाबूल ब्रह्मा म्हणाले की, ”29 डिसेंबर रोजी ही घटना घडली. त्यात कोणत्याही प्रकारची हाणी झाले वृत्त नाही.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत 21 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.