(फोटो सौजन्य – X)
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. याअंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवरील हल्ल्याबाबत दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकीकडे युद्धबंदीचे उल्लंघन आणि दुसरीकडे भारताचा प्रत्युत्तरात्मक हल्ला आणि हवाई हल्ला हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये दुःखाचे वातावरण आहे तर याच पाकिस्तानमधील एका भागात लोक या गोष्टीचा आनंद व्यक्त करताना दिसून आले आहेत.
पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर बलुचिस्तानमधील पठाणांनी जल्लोषात खूप डान्स केला आणि आपला आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात, पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर बलुचिस्तानच्या लोकांनी एक उत्सव आयोजित केला आणि मोठ्या उत्साहात डान्स केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, बलुचिस्तानचे लोक मोठ्या उत्साहाने नाचताना दिसून आले. यावेळी त्यांच्या हातात बंदुका आहेत आणि त्यांची कंबर, मान आणि पाय सर्व गाण्याच्या तालावर डोलत आहेत. त्यांचे चेहरे पाहता त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच, बलुचिस्तानच्या सैन्याने एका पाकिस्तानी ट्रेनचे अपहरण केले, ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिकांसह काही लोक मारले गेले. पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते कारण बलुचिस्तान सुरुवातीपासूनच एका वेगळ्या देशाची मागणी करत आहेत.
Live Visuals 🚨
Celebrations have started in Balochistan after India’s 🇮🇳 Operation Sindhoor against Pakistan 🇵🇰 pic.twitter.com/zeg2lBI1zB
— Richard Kettleborough (@RichKettle07) May 7, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @RichKettle07 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानमध्ये जल्लोष सुरू झाला आहे” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा कधीचा व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”नमक हराम”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.