माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन...; VIDEO पाहून रक्त उसळेल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अंगणावाडी केंद्राच्या पायऱ्यावर एक लहान मुलगी उभी आहे. तितक्यात तके एक महिला येते. ती तिच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता तिच्या पाठीवर लाथ मारते. यामुळे चिमुकली पायऱ्यांवरुन खाली पडते. अचनाक झालेल्या या अमानुष प्रकारामुळे चिमुरडी घाबरते आणि रडू लागते. धक्कादायक बाब म्हणजे याच वेळी दुसरी एक महिला हसत बाहेर येथे आणि लाथ मारणाऱ्या महिलेला तिथून बाजूला जाण्यास सांगते. नंतर ती खाली पडलेल्या मुलीला उचलून घेते.
🚨Aanganwadi Horror.
No kid should endure this ! Video from Nandgaon, Panvel, shows minor girl being kicked & assaulted Every second without action is a failure. If true, arrest the accused, protect the child & deliver swift justice pic.twitter.com/RVivy3Lgqc — The Lie Lamaa 🏹 (@_TheLieLamaa) June 26, 2026
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामुळे अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांना अशा क्रूर ठिकाणी ठेवावे का असा प्रश्न त्यांच्या मनात येत आहे. एका नेटकऱ्याने हे कृत्य अत्यंत क्रूर आहे. मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती असे करत असेल तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असे म्हटले आहे. अनेकांनी याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि कारवाईची मागणीही केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






