(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, पाण्याच्या खोल आत मादी व्हेल मासा आणि तिचे पिल्लू आहे. आईचं दूध पिण्याची माशांचीही प्रक्रिया काहीशी वेगळी असल्याचे व्हिडिओत दिसले. महासागरात, जिथे त्यांना पाण्याने वेढलेले आहे अशा परिसरात आपल्या बाळाला दूध पाजणे काहीसे कठीण आहे आणि म्हणूनच एक अनोखी पद्धत व्हेल मासे अवलंबत असल्याचे दिसून आले. यात दिसले की, मादी व्हेल प्रचंड दाबाने आपल्या शरीरातून दूध बाहेर काढते जे बरोबर खाली असलेल्या बाळाच्या तोंडात जाते. पिल्लू दूध न ओढताच त्याच्या तोंडात दूध बरोबर पोहचते. मुख्य म्हणजे यावेळी हे दूध पाण्यास मिसळले जात नाही. तज्ञांच्या मते, व्हेलचे दूध सामान्य दुधापेक्षा खूप जास्त स्निग्ध आणि घट्ट असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे पिलांना वेगाने वाढण्यास आणि थंड सागरी वातावरणात टिकून राहण्यास मदत होते. याच कारणामुळे व्हेलची पिल्ले खूप कमी वेळात वेगाने वाढतात.
व्हेल माशाला असे दूध पाजताना पाहून यूजर्स थक्क झाले तर अनेकांनी घटनेवर आपले आश्चर्य व्यक्त केले. या प्रसंगाचा व्हिडिओ @growthologyyyyy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “दूध खूपच दाट आहे; ते मिठाच्या पाण्यामध्ये सहजपणे मिसळत नाही आणि थेट बाळाच्या तोंडात जाते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्ग किती बुद्धिमान आहे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरं तर तो हंपबॅक व्हेल आहे. ब्लू व्हेल खूप मोठे असतात आणि त्यांचे पर खूप लहान असतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






