(फोटो सौजन्य – Instagram
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. या गोष्टी नेहमीच आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात ज्यामुळे कमी वेळातच त्या व्हायरल होतात. इथे दररोज असंख्य व्हिडिओ शेअर केले जातात आणि यातील काही व्हिडिओज युजर्सचे विशेष लक्ष वेधतात. असाच एक लक्षवेधी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीडची आहेत. ही दृश्ये पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गावात रस्त्याच्या मधोमध एक बांबू उभारण्यात आला असल्याचे दिसून येते. यावेळी रस्त्यावर काही लोक जमलेली असतात आणि पुढेच आपल्याला एक मुलगा एक धक्कादायक स्टंट करताना दिसून येतो ज्यानंतर संपूर्ण वातावरण बदलते. व्यक्तीचा स्टंट इतका धोकादायक आणि थरारक असतो की तो पाहून सर्वांचेच होश उडतात. वास्तविक, हा मुलगा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पातळ बांबूवर चढतो आणि बांबूच्या टोकाशी पोहचतो. यानंतर हेलिकॉप्टरचे पाते फिरावेत तास हा मुलगा बांबूच्या टोकावर झोपून गरागरा फिरू लागतो. त्याचा हा स्टंट फारच धोकादायक असून ज्याने तो पाहिला त्याच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहिला नाही.
कुछ नहीं ब्रो बस बंदी ने बोल दिया गर्मी लग रही है pic.twitter.com/dHcwmxXaZp
— Dr.khatra Commentary (@dumbitpatra15) May 1, 2025
मुलाचा हा स्टंट @dumbitpatra15 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज आणि हजारो लाइक्स मिळाले असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” आता पूर्ण गाव हवा खाईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फार धोकादायक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता समजले तू इतके दिवस गायब कुठे होता, इथे होता तर तू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.