(फोटो सौजन्य – Instagram)
जंगलातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र आता इथे थरारक दृश्य व्हायरल झाले आहे ज्यात चक्क काही श्वानांनी किंग कोब्रावर आपला निशाणा साधल्याचे दिसून आले. हे दृश्य फारच धक्कादायक आहे कारण मुळातच कोब्रा हा आपल्या विषारी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. त्याचे विष कुणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकते ज्यामुळे जंगलातील मोठमोठे प्राणीही कोब्राला घाबरून असतात. अशात कुत्र्यासारख्या सामान्य प्राण्याने त्याच्यावर हल्ला करणे आता सर्वांना थक्क करत आहे. व्हिडिओतील कोब्राची अवस्था सर्वांनाच चकित करत असून यात नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
जंगलाच्या मध्यभागी अचानक सुरू झालेले हे भयानक दृश्य सर्वांनाच धक्का देत आहे. व्हिडिओमध्ये, एक किंग कोब्रा त्याच्या फणा पसरून उभा असल्याचे दिसून येते. मात्र तितक्यात तिथे एक श्वानांचा गट येतो आणि कोब्राला सर्व बाजूंनी घेरतो. किंग कोब्रा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण कुत्रे त्याच्यावर वारंवार हल्ला करतात. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कुत्रे सापावर भुंकत त्याला चावण्याचा प्रयत्न करतात. ही थरारक लढत जंगलातील एक अनोखे चित्र दाखवून देते. एकजुटीत किती ताकद आहे ते आपल्याला व्हिडिओत पाहता येते. कोब्रा कितीही शक्तिशाली असला तरी श्वानांच्या एकजुटीपुढे त्यालाही हार मानावी लागते. व्हिडिओमध्ये निसर्गाचा तो पैलू दाखवला आहे जिथे प्रत्येक क्षणी जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरू असतो.
दरम्यान अनोख्या लढतीचा हा व्हिडिओ @ayub_rider28_official.follow नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज आणि हजारो लाइक्स मिळाले असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे हास्यास्पद नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप भयानक आहे हे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.