पट्ट से हेडशॉट! आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला पण काकू आल्या अन्...; पाहा काय घडलं, मजेशीर VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही प्रियकर प्रेयसीचे अनेक मजेशीर व्हिडिओ पाहिले असतील.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियकराला आपल्या प्रेयसीला भेटायला जाणे महागात पडले आहे. प्रेयसीच्या आईने त्याला असा धडा शिकवला आहे की पुन्हा तो प्रेयसीला भेटायला जाण्याआधी दहा वेळा विचार करेल.
तसे पाहायला गेले तर अनेकदा तरुण-तरुणी त्यांचे प्रेमप्रकरण घरच्यांपासून लपवून ठेवतात. त्यांना घरचे वेगळे करण्याची भीती मनात असते, किंवा काहींना आपल्या नाते लपवून ठेवयाचे असते. यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी अनेकदा लपून भेटावे लागते. कारण ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीने पाहून नये, आणि त्यांचे प्रेम प्रकरण बाहेर येऊ नये. असेच काहीसे या तरुणाने केले असावे. तो आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. यावेळी तो तिच्या घराच्या मागे गेला. तसेच तरुणी प्रेयसी भीतींच्या मागे उभे राहून त्याला भेट आहेत.
तरुणी त्याला लवकर गुलाल लावयला आणि तिथून जायला सांगते. यावेळी तरुण तिला गुलाल लावतो, आणि नंतर तरुणी देखील त्याला गुलाल लावते. दोघेही आसपास कोणी नाही ना याची पाहणी करतात. यावेळी तरुण तरुणीला किस करायला जातो, पण इतक्यात तरुणीच्या बाजूने तिची आई येते आणि त्याच्या कानाखाली सटकन मारते. हा व्हिडिओ इथेच संपतो. पण कदाचित मुलीच्या आईने दोघांचे प्रेम प्रकरण पकडले असून दोघांना नक्कीच मार बसला असणार आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @trendingpage100k या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूद मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. एका नेटकऱ्याने बरोबर निशाण्यावर बसला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने काय अचूक टायमिंग आहे, असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.