'Google Gemini'वरुन फोटो तयार करताय? मग 'हा' व्हिडिओ पाहा; तरुणीने शेअर केला भीतीदायक अनुभव, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Gemini AI Photosचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक आपले फोटो Gemini वरुन टाकून रेट्रो सारी लुक, एनिमेटेड Nano Banana, 3D मॉडेल मध्ये बदलुन घेत आहेत. यापूर्वी गिबलीचाही ट्रेंड सुरु होता. ज्यामध्ये तुमचे फोटो जपानी कार्टून सारखे बनवून मिळत होते. या ट्रेंडने संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत अनेकांनी ५० हून अधिक फोटो Goggle Gemini, AI वापरुन तयार केले असतील.
एवढेच नव्हे आपल्या आयुष्यातील गमवलेल्या व्यक्तींसोबत देखील फोटो तयार करुन मिळत होता. तसेच अनेक सिलिब्रेंटिसारखे फोटोशूटचे फोटो घरबसल्या तयार करुन मिळत होते. यामुळे हा ट्रेंड जवळपास सगळ्यांच्याच पसंतीस पडला होता. पण काहींना प्रश्न पडला आहे का हा ट्रेंड कितपत सुरक्षित आहे? यामुळे आपल्या फोटोचा गैरवापर तर होणार नाही ना?, असे बरेच प्रश्न आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये एका तरुणीने एक भीतीदायक अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसले. या तरुणीते नाव झलक भवनी असून तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तुमच्याप्रमाणे तिने देखील Gemini Ai चा वापर केला होता. तिने आपला लुक रेट्रो साडीच बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने Gemini वर एक फोटो शेअर केला आणि प्रॉम्ट टाकला. त्यानंतर तिला तिचे फोटो छान अशा काळा रंगाच्या साडीत करुन मिळाला होता. ती खूप खूश झाली होती. मात्र काही क्षणांनी फोटो बघताना तिला धक्का बसला.
झलक व्हिडिओमध्ये सांगितले की, तिने Gemini पूर्ण बाह्याचा ड्रेस घातलेला फोटो शेअर केला होता. तिचा काळ्या साडीतील फोटोही छान होता. पण जेव्हा तिचे लक्ष फोटोत उजव्या हाताच्या तिळावर गेले तेव्हा तिल धक्का बसला. तिच्या मते तिने पूर्ण बाह्यांचा ड्रेस घातलेला फोटो शेअर केला होता तर Gemini ला तिच्या हातावर तीळ असल्याचे कसे लक्षात आले. तिचा हात तर पूर्णपणे झाकेलेला होता. मग Gemini ला तिच्या उजव्या हातावर तीळ असल्याचे कसे कळाले असे तिने विचारले.
तिने लोकांना कोणताही AI ट्रेंड करण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. हा ट्रेंड त्यांच्या जीवनासाठी घातकही ठरु शकतो. यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील गोपनियतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र काही लोकांन हे खोटे असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी झलकाला पाठिंबा दिला आहे.
झलक भवानीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @jhalakbhawnani या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर काहींनी झलकला सपोर्ट केला आहे. तर काहींनी तिचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.