(फोटो सौजन्य: Instagram)
आयुष्याच्या वळणावर आपल्यासोबत कधी काय घडून येईल ते सांगता येत नाही. आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या, वाईट गोष्टीची परतफेड आपल्याला करायला लागते हे कधी आपण विसरुन जायला नको. आजकाल रिल्सचा जमाना आहे आणि इथे चर्चेत राहण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही नवीन करुन स्वत:ला व्हायरल करण्यासाठी प्रयत्न करतं. रिल्स बनवणं काही चुकीची गोष्ट नाही पण त्याच्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणं हे नक्कीच चुकीचं आहे. आपण केलेले प्रत्येक स्टंट हे यशस्वी होतातच असं नाही तर काही अयशस्वीही होतात. अशीच एक घटना मुलासोबत घडून आली. पेट्रोल गटकत हवेत आगीचा फव्वारा करत त्याने एक जीवघेणा स्टंट करु पाहिला पण त्याचा हा पराक्रम त्याच्यावरच उलटा पडला आणि त्याचं संपूर्ण तोंड पेटून उठलं. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यातील दृश्ये तुम्हाला चक्रावून सोडतील.
काय दिसलं व्हिडिओत?
स्टंटबाजीच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, यात काही मुलं मिळून काही खुरापती करत असल्याचे जाणवते. यातील एक मुलगा आपला जीव धोक्यात घालून आगीसोबत स्टंट करत असतो आणि बाकीचे तो नक्की काय करत आहे हे बारकाईने पाहत असतात. मुलाच्या एका हातात आगीने पेटलेली काडी असते तर दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली असते. मुलगा आपल्या तोंडात पेट्रोल घेऊन त्याचा फव्वारा उडवत त्यावर आगीच्या काडीने हवेत आगीचा फव्वारा तयार करण्याचा प्रयत्न करतो पण तितक्यातच ती आग त्याच्या तोंडावर पडते आणि त्याचे संपूर्ण तोंड जळून निघते. मुलगा आग विझवण्याचा फार प्रयत्न करतो पण काहीकेल्या ती आग विझायचे नाव घेत नाही. मुलाच्या वेदना आणि बाकी मुलांची कळवळ व्हिडिओत स्पष्ट दिसून येते पण या घटनेत पुढे नक्की काय घडतं ते व्हिडिओत दाखवण्यात आलं नाही.
सदर घटना फारच धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी आहे. याता व्हिडिओ @mohemed_fekry नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “क्षणातच तो आग ओतणारा ड्रॅगन बनला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणून नको त्या गोष्टी करु नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो आता ठीक आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.