(फोटो सौजन्य: Instagram)
काळासोबतच मानवाची बुद्धीही प्रगत होत चालली आहे आणि यासोबतच आपल्याला पाहायला मिळत आहेत नवनवीन तंत्रज्ञान. भविष्यात जगात मानवांच्या जोडीलाच रोबोट्सही एकत्र वावरताना, काम करताना दिसून येतील ही गोष्ट उघड आहे. अशातच आता एक नवीन आणि अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात जंगलात एका चित्त्यासमोर रोबोट डाॅग उभा असल्याचे दिसून येते. रोबोट डाॅग चित्त्यासमोर आपले कर्तब करुन दाखवतो पण ते पाहून चित्त्याला त्याची भितीच वाटू लागते. पहिल्यांदाच कोणता रोबोट त्याच्या समोर आल्याने आधी तो जरा घाबरतो आणि तो आपल्याला काहीतरी करेल या भितीने तो त्यांच्यापासून दूर पळू लागतो. हे दृश्य पाहणं फारच मनोरंजक ठरलं, कारण जंगलातचा धोकादायक शिकारी एका सामान्य रोबोटला पाहून घाबरत आहे ही गोष्ट सर्वांनाच थक्क करणारी आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात जंगलात एक रोबोट डाॅग आणि चित्ता एकमेकांसमोर आमने-सामने भिडताना स्पष्ट दिसून येतात. तलावाशेजारी चित्ता शांत वातावरणाची मजा घेत बसलेला असतो आणि तितक्यातच त्याच्या समोर एक रोबोट डाॅग येऊन आपले कर्तब दाखवू लागतो. हा कोणता नवीन प्राणी जंगलात आला आहे असा विचार कदाचित त्याच्या मनात आला असावा, ज्यामुळे त्याला पाहताच आधी तो घाबरतो आणि मग त्याच्यापासून दूर पळू लागतो. रोबोट आपल्या जवळ येत आहे हे समजताच तो त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण रोबोट अजिबात त्याला घाबरत नाहीये हे पाहून तोच घाबरुन त्याच्यापासून आपला पळ काढू लागतो. जंगलाचा सर्वात वेगवान शिकारी एका रोबोटला घाबरत आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि लोकांनी हा व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली.
जंगलातील ही मजेदार दृश्ये @naturegeographycom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपण खरोखरच निसर्गाला एकटे सोडले पाहिजे. आपल्या मूर्ख खेळण्यांसमोर ते का उघड करायचे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला ते भूत वाटलं असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “रोबोटला त्याच्यासोबत खेळायचं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.