(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे असे अनेक घटना आणि त्यांचे व्हिडिओज शेअर केले जातात ज्यांचा विचार आपण कधीही केला नसेल. कधी कधी आपला अतिशहाणपणा आपल्या वाईटास कारणीभूत ठरतो आणि यातूनच आपल्याला जन्माचा धडा मिळतो. नको त्या वेळी नको ते करणं एका आज्जींना चांगलंच महागात पडलं आणि मग जे घडलं त्याने सर्वच हादरून गेले. वास्तविक व्हिडिओमध्ये एक आज्जी घराच्या बाजूने जाणाऱ्या म्हशीला हिणवत तिला हडतूड करताना दिसून आल्या, ज्याच्या उत्तरात म्हशीने त्यांना असा दणका दिला की आज्जीच काय तर संपूर्ण इंटरनेट हादरून गेलं. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात स्पष्ट दिसत की, एक आज्जी घरासमोर उभ्या आहेत. यावेळी लांबूनच एक म्हैस रस्त्याने जात असते जिला पाहून आज्जी भडकतात आणि तिला हडतूड करायला सुरुवात करतात. आता आज्जीची ही कृती म्हशीला काय फार आवडत नाही. ती क्षणाचाही विलंब न करता वेगाने आज्जींच्या दिशेने धाव घेते आणि आपल्या शिंगांनी ओढतच आज्जीला घरात नेऊन तुडवते. म्हशीचा वेग आणि हल्ला इतका जबरदस्त आणि वेगवान असतो की अवघ्या काही सेकंदातच ही घटना घडून जाते आणि आज्जींना काही करताही येत नाही. म्हशीचा हा भीषण हल्ला आता सोशल मीडिया युजर्सना चांगलाच थक्क करत असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच अंगावर शहारा आणला आहे. ही घटना नक्की कुठली आहे आणि यात आज्जीचा जीव वाचला की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @sanaprhmlikit नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिच्यासाठी प्रार्थना पाठवत आहे, बघून वाईट वाटलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाजूने जाता जाताच त्याने खेळ बदलला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिचारी आज्जी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.