चिनी विद्यार्थ्यांचा भन्नाट अविष्कार; कोकच्या बाटलीपासून तयार केले रॉकेट, थक्क करणारा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर जगभरातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे डिजिटल युगात अनेक देश अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोठी प्रगती करत आहेत. वैज्ञानिक, संशोधक, अनेक विविध अविष्कार शोधून काढत आहे. यामध्ये चीन अग्रग्ण आहे. सध्या चीनमध्ये रोबोट्सची ह्यूमनॉइड बॉक्सिंग आणि फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. चीनमधील लहान मुले देखील यामध्ये मागे नाही. या देशात लहानपणीपासूनच मुलांना तंत्रज्ञानाचे ज्ञान दिले जाते. यामुळे भविष्यात येथील विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात अनेक अविष्कार घडवून आणतील.
सध्या सोशल मीडियावर चिनी मुलांच्या जुगाडू आणि भन्नाट अविष्काराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिनी मुलांनी प्लॅटस्टिकच्या बाटल्यांपासून भन्नाट असे रॉकेट तयार केले आहेत. हे रॉकेट बनवण्यासाठी कोकाकोलाच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि घरगुती संसाधनांचा वापर केला आहे. तसेच एक रिमोट कंट्रोल तयार केले आहे. रिमोट कंट्रोलच्या मदतने मुलांनी रॉकेट लॉंन्च केले आहे. यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पाणी आणि हवेच्या दाबामुळे रॉकेट उंचावर गेले आहे.
तुम्ही पाहू शकता की, अगदी खऱ्या रॉकेटसारखे चिमुकल्याच्या रॉकेटचे उड्डाण दिसत आहे. शिवाय याचे लॅंडिगही भन्नाट करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रॉकेट परत जमिनीवर लॅंड होताना पॅराशूट ओपन होऊन खाली उतरले आहे. हा व्हिडिओ ड्रोन कॅमेराच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्का झाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
In China, students made a two-stage rocket using a cola bottle and water pressure. pic.twitter.com/hHvLa0kpWq — Tansu Yegen (@TansuYegen) July 17, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TansuYegen या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘चीनमध्ये विद्यार्थ्यांनी कोला बाटली आणि पाण्याच्या दाबाचा वापर करुन दोन टप्प्यांचे रॉकेट बनवले’ असे लिहिले आहे. यावर अनेकींनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने हॉट-स्टेजिंग रिंगची गरज संपली, एलॉन फक्त प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि हवा वापरा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने हे खूप भारी आहे, शब्बास मुलांनो अशा शब्दांत चिनी मुलांचे कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.