नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एक अतिशय भयानक व्हिडिओ (Dangerous Video) समोर आला आहे. ज्यामध्ये अचानक धरणीकंप झाल्याने एक जिवंत कुत्रा (Dog) त्यात गाडला गेला. ज्याने ही घटना पाहिली त्याचे डोळे पाणावले. तेथे उपस्थित लोकांचे प्राण थोडक्यात वाचले. वास्तविक, ही घटना दिल्लीतील आर.के. पुरम (RK Puram) भागातील आहे.
त्या वेळी अचानक जमीन खचू लागल्याने रस्ता गडप झाला आणि त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. तेथे एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा दोन बाईकच्या मधोमध कसा आराम करत आहे हे दिसत आहे. ज्याला पुढच्या क्षणी त्याचे काय होणार हे देखील माहित नाही.
पुढे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा आणि बाईक जवळ अचानक धरणीकंप कुत्रा आणि बाईक दोघेही १० फूट खोल खड्ड्यात पडले. मात्र, यादरम्यान तेथून येणारे लोकांनी हे पाहून सुदैवाने बाजूला झाले. अन्यथा त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकला असता.
https://twitter.com/Damini_14/status/1629418084632068097
विशेष म्हणजे या घटनेची माहिती पोलीस, जल मंडळ आणि अग्निशमन दलाला मिळताच ते तात्काळ दाखल झाले आणि त्यांचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पथकांना त्या ठिकाणी नाकाबंदी करून पुढील कारवाई केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.