Delhi Metro : लिफ्टमध्ये बुजूर्ग व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दिल्ली मेट्रोत एका वृद्ध व्यक्तीने लघुशंका केल्याचा दावा एका तरुणीने केला आहे. तिने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी यामागचे कारण सांगितले आहे. दिललीच्या कालकाजी मंदिर मेट्रो स्टेशनवर हा प्रकार घडला आहे.
तरुणीने केलेल्या दाव्यानुसार, एका वृद्ध व्यक्तीने लिफ्टमध्ये लघुशंका केली होती. यावेळी लिफ्टमध्ये दोन मुली आणि एक मुलगा देखील होते. यामुळे महिलेने संतापून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आजोबांना जाब विचारण्यास सुरुवात केला. यावेळी आजोबांनी अगदी हतबल होत, हो, तर सॉरी, जे कारायचं आहे ते कर असे म्हटले. यावेळी आजूबाजूचे प्रवासीही अस्वस्थ झाले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सत्य उघडकीस केले. पोलिसांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये माहिती दिली की, ही घटना १५ मे २०२६ रोजी रात्री ९.४० च्या दरम्यान घडली होती. हे गृहस्थ जामिया मेट्रोवरुन फरिदाबादला निघाले हते. यावेळी कालकाजी स्टेशनवर मेट्रो बदलत असताना त्यांना अचानक मेडिकल इमर्जन्सी जाणवली.
त्यांनी तातडीने वॉशरुम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळत सुविधा न मिळाल्याने आणि वाढत्या वयामुळे त्यांचे नियंत्रण सुटले त्यांची प्रकृती बिघडली. पोलिसांनी स्पष्ट केले की, गृहस्थाने थेट लिफ्टमध्ये लघवी न करता असहाय्य होऊन एका प्लास्टिकच्या बाटलीत करण्याचा प्रयत्न केला होता.
सध्या या घटनेवर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर लोकांनी महिलेवर टीका केली आहे. तर काही वृद्ध व्यक्तीबाबात सहानुभूती दाखत आहेत. वृद्ध माणसाच्या आजारपणाचा व्हिडिओ बनवनू त्यांना जगजाही ट्रोल करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवनू प्रसिद्ध मिळवणे थांबवा, वृद्धकाळात आणि आजारपणात कोणासोबतही असे घडू शकते असे काहींचे म्हणणे आहे. काहींनी प्रशासनाला वृद्धांसाठी जागोजागी शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






