काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडीएफ मुलगी आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात त्यांची वाट पाहत उभी होती. त्यावेळी सौरभ सोनवणे हा तिला भेटला. त्याने त्या मुलीच्या हातात असलेला मोबाईल फोन हिसकावून घेतला. मुलींनी जेव्हा त्याला मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभ याने मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल असं सांगितले. यानंतर सौरभ सोनवणे याने मुलीला कल्याण रेल्वे गार्डन घेऊन गेला. तिथे सौरभ ने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने कशीबशी करून त्याच्या तावडीतून सुटका केली आणि पोलीस स्टेशनला धाव घेतली.
आरोपी अटकेत
पोलीस ठाण्यात तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी हा सगळा प्रकार ऐकत तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सौरभ सोनवणे याला शोधून काढले. या घडलेल्या घटनेने संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?
Ans: या प्रकरणातील आरोपीचे नाव सौरभ सोनवणे आहे.
Ans: आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मुलीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Ans: पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली.






