गटारात पाडलं, अंगावर धावले, पण..., रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला रात्री घराच्या दिशेने निघालेली आहे. याच वेळी रस्ता रिकामा असल्याचा फायदा घेत मागून दोन चोर दुचाकीवर तिथे पोहोचतात. दोन्ही चोर महिलेच्या हातातील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करतात. पण महिला पूर्णताकदीने त्यांना विरोध करते. तुम्ही पाहू शकता चोर बाईकवरुन उतरुन महिलेची बॅग हिसकावत आहे. परंतु महिला आपली बॅग सोडत नाही. यामुळे चोराने तिला धक्का देऊन गटारात पाडले आहे, जमिनीवर आपटले आहे. पण तरीही महिला आपली बॅग सोडत नाही. चोर आणि महिलेत काही मिनिटे ओढाताण सुरु आहे. परंतु शेवटी चोरांना महिलेच्या हिमतीपुढे रिकाम्याहाताने परत जावे लागले आहे.
असली शेरनी तो ये है
उत्तर प्रदेश के एटा में एक महिला को दो बाइक सवार बदमाशों ने लूटने का प्रयास किया लेकिन महिला ने गजब की दिलेरी दिखाई। वह भिड़ गई और भिड़ी ही रही जब तक कि बदमाशों ने वापस भागने का फैसला नहीं ले लिया। महिलाओं को इतना मजबूत बनाया जाना चाहिए pic.twitter.com/weZ0SmOYQB — Arvind Chotia (@arvindchotia) May 14, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडओ एक्सवर @arvindchotia या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा संपूर्ण प्रकार पाहून नेटकऱ्यांनी महिलेचे तीव्र कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने हीच खरी वाघिण असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने दूध पिणाऱ्या वाघिणीशी पंगा घेऊन फसले चोरटे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






