पर्वतीमध्ये आजोबानेच केला होता लैंगिक अत्याचार करायचा प्रयत्न
लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित मुलीच वय अवघ ९ वर्षाच आहे. या मुलीवर तिच्या चुलत आजोबाकडून अत्याचार करण्यात आला. धनराज झुपरे बालाटी (रा . नेपाळ) अस या आरोपी नराधम आजोबाच नाव आहे. हे सगळे पुण्यात राहतात. कामावर गेले असताना घरात कोणी नाही याची माहिती त्याने घेतली आणि घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. जेव्हा कामावरून सगळे घरी आले तेव्हा तिने हा सगळा प्रकार सांगितला. नंतर कुटुंबाने जाऊन तक्रार दिल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
शिवसेना शिंदे गटाने केल आंदोलन पोलीस स्टेशन वर काढला मोर्चा
या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज शिवसेना शिंदे गटाने पुण्यात आंदोलन केल. खडी मशीन चौक ते पोलीस स्टेशन असा काढला मोर्चा. या मोर्च्यात हातात फलक घेवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या आधी नसरापूर घडल आता येवलेवाडी आरोपींना धाक राहील नाही. या प्रकरणाचा तपास कडक कारवाई करावी यासाठी आज आंदोलन करण्यात आल. पोलीस स्टेशन शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या मांडण्यात आला होता. कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?
Ans: पीडित मुलीचे वय अवघे ९ वर्षे आहे.
Ans: होय, तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Ans: आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाने मोर्चा आणि आंदोलन केले.






