फोटो सौजन्य: iStock
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. मेट्रोचे तर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात दिल्ली मेट्रोच्या व्हिडीओ देखील असतात. दिल्ली मेट्रो ही येथे राहणाऱ्या आणि या शहराला भेट देणाऱ्या लोकांची जीवनवाहिनी मानली जाते. परंतु आजकाल ही मेट्रो लोकांना त्यांना जायच्या असलेल्या ठिकाणी पोहोचवण्यापेक्षा त्यात होणाऱ्या घटनांमुळे व्हायरल व्हिडिओंसाठी जास्त प्रसिद्ध होत आहे.
सीटसाठी प्रवाशांमध्ये भांडणे, रोमँटिक सीन, कपल्सची लव्ह मेकिंग, गॉसिप आणि लाईव्ह गाणी किंवा इतर अनेक प्रकारच्या डान्स रील्ससाठी दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते. नुकताच पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मात्र, हाणामारी कशामुळे झाली हे समजू शकले नाही.
व्हायरल व्हिडीओ
दिल्ली मेट्रोचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया साइट एक्सवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन लोक कोणत्यातरी कारणावरून भांडत आहे. भांडत असताना त्यातील एक आपली चप्पल काढतो आणि गेटजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला मारायला लागतो. दुसरी व्यक्तीही कमी नव्हती, त्यानेही तसेच केले. त्या व्यक्तीच्या हातातील चप्पल घेऊन त्या व्यक्तीला मारले आणि पलीकडे पळून गेला. त्याचवेळी आणखी एक व्यक्ती त्याचा पाठलाग करते, पण मध्येच दुसरी व्यक्ती येऊन त्याला अडवते. हस्तक्षेप करणारी व्यक्ती लढवय्यांसोबत होती की नाही हे कळू शकले नाही.
हे देखील वाचा- दिल्ली मेट्रोतून माकडाचा प्रवास; व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले…
Kalesh b/w Two Guys inside Delhi Metro
pic.twitter.com/uIll8KqCWk— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 30, 2024
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर 3700 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आजकाल दिल्ली मेट्रो मनोरंजनाने भरलेली आहे. तुम्ही ॲक्शन सीन्स, रोमँटिक, लव्ह मेकिंग, गॉसिप आणि गाणी देखील पाहू शकता.’ तर दुसऱ्या एका युजरने म्हणले की, ‘मेट्रोच्या आत कोणी चप्पल काढून दुसऱ्याला कसे मारहाण करू शकते? दिल्ली पोलिस कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे आणि यापुढे अशा लोकांना मेट्रोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘जगातील इतर मेट्रोच्या तुलनेत दिल्ली मेट्रोमध्ये सर्वात शांत प्रवासी आहेत. मोफत मनोरंजन आणि रिॲलिटी शो दररोज चालतात. दिल्ली मेट्रोला कोणीही हरवू शकत नाही, फक्त प्रवाशांना मारहाण होते.’