प्रसादाची ऐसी की तैशी! हजारो किलोच्या लाडूवर पाय देत चढले भक्तगण, धक्कादायक Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, भक्तींनी प्रसादासाठी एकमेकांना लाथ-बुक्क्या मारल्या आहेत. कोणीही शिस्तेने, स्वच्छतेची काळजी घेतलेली नाही. मोठ्या प्रमाणात लोक त्यावर पाय देत आहे. लोक घामा-घुम झाले आहेत. त्यांचा घाम त्या प्रसाद पडत असले आणि यामुळे तो प्रसाद अस्वच्छ झाला असेल याचेही भान त्यांना राहिलेली नाही. केवळ अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालत आहे म्हणून आपणही त्यात सहभागी व्हायचे एवढेच लोकाना वाटत आहे. परंपरेनुसार, हा प्रसाद लोकांना आरोग्य, शक्ती, समृद्धी मिळते असे म्हटले जाते. परंतु या प्रकारे प्रसाद घेणे हे कितपत आरोग्यासाठी चांगले आहे असा प्रश्न पडतो.
KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या, Video Viral
3,000 kg of prasad (food offering) was looted within minutes at a Hindu temple in Gujarat. This loot is an offence but a centuries-old tradition, based on the religious belief that it brings good health, peace and prosperity. Good health? Please maintain hygiene too. pic.twitter.com/8iAGjYIuKh — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) December 18, 2025
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SurajKrBauddh या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. प्रसादावर पाय देणे त्यावर तुटून पडणे हे पाप असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने खरे तर परंपरा अर्थपूर्ण आहे, पणू मूलभूत स्वच्था, सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी राहिलेली नाही, असे एकाने म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






