(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून तुमचे होश उडतील. ही घटना अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे घडून आली. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात एक विचित्र घटना घडली जी आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. वास्तविक शवपेटील कबरीत टाकण्यासाठी नेले जात होते मात्र तितक्यात असे काहीतरी घडते ज्याने सर्वच हादरून जातात. नक्की काय घडते ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, २१ मार्च रोजी बेंजामिन एव्हिल्स नावाच्या एका व्यक्तीचे हृदयरोगामुळे निधन झाले. अंत्यसंस्काराच्या तयारीनंतर, बेंजामिनला दफनविधीसाठी ग्रीनमाउंट स्मशानभूमीत नेले जात असताना शोकाकुल कुटुंब शवपेटीसह कबरीत पडले. या अपघातात लोकांना पाय, हात आणि पाठीला दुखापत झाली. त्याच वेळी, सर्वात वाईट अवस्था मृताच्या मुलाची होती जो त्याच्या वडिलांच्या शवपेटीखाली कबरीत गाडला गेला.
मृताची सावत्र मुलगी मेरीबेल रॉड्रिग्ज म्हणाली की शवपेटी तिच्या भावाच्या वर होती आणि तो खाली बेशुद्ध पडला होता. त्याचा चेहरा चिखलात अडकला होता. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याने या घटनेसाठी स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार गृहाला जबाबदार ठरवले आहे. तसेच, स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार गृहाला समारंभात झालेल्या व्यत्ययाबद्दल माफी मागण्यास आणि भरपाई देण्यास सांगितले आहे.
NEW: Deceased man’s son gets trapped under his father’s casket after a platform collapsed, taking the entire family into the grave.
That’s unfortunate.
The incident happened at a funeral in Philadelphia for Benjamin Aviles who passed away in late March.
When the pallbearers… pic.twitter.com/0Zha1mnKnN
— Collin Rugg (@CollinRugg) April 8, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर @CollinRugg नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुर्दैवी म्हणणेही कमी ठरेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुटुंबासाठी खूप दुःखद आहे. अंत्यसंस्कार संचालक किंवा स्मशानभूमीने खूप निष्काळजीपणा केला, असे व्हायला नको होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.