(फोटो सौजन्य: Instagram)
नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक अनोखे दृश्य दिसून आले. यात वाळवंटातील उंट चालू रस्त्यावर पळताना दिसून आला. उंट हा वाळवंटात राहणार प्राणी आहे अशात शहरी रस्त्यावर त्याला असे पळताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्याचा मालक मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना हैदराबादमधील पीव्ही नरसिंह राव एक्सप्रेसवेवर रात्रीच्या सुमारास घडून आली. उड्डाणपुलाच्या काठावर एक व्यक्ती उंटावर स्वार झाला आणि त्यांनतर जे झालं ते आणखीन धक्कादायक! चला यात घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक उंट चालू रस्त्यावर पळताना दिसून आला. त्याचा मालकही त्याच्यावर बसलेला असतो मात्र यावेळी तो दारूचे नशेत धुंद असतो ज्यामुळे तो उंटावर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यानंतर उंट अनियंत्रित होतो आणि वेगाने रस्त्यावर धावू लागतो. वाळवंटातील उंटाने कुठे फारशा गाड्या पहिल्या असतील अशात रस्त्यवर धावणाऱ्या इतक्या गाड्या पाहून तो घाबरतो आणि रस्त्यावर जोरजोरात पळतच सुटतो. व्हिडिओमध्ये प्राण्याचे झालेले हाल स्पष्टपणे दिसून येत आहेत. अशात उंटाचे हे हाल पाहून कारमधील एक माणूस मालकाच्या तोंडावर पाणी फेकत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो मात्र याचा काही फायदा होत नाही. शेवटी माणूस गाडीतून उतरतो आणि त्याच्या मित्रासह उंटाला थांबवतो.
यांनतर उंटाला रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला बांधले जातात आणि मद्यधुंद माणसाला खाली उतरवतात. अशाप्रकारे रस्त्यावर होणारा अपघात टाळला जातो. घटनेचा व्हिडिओ @ikshorts नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, लोकांनी उंट मालकाच्या निष्काळजीपणावर टीका केली आणि उंटाला थांबवणाऱ्या माणसांचे कौतुक केले. एका युजरने लिहिले आहे, “शाब्बास भाऊ, जर तुम्ही मला थांबवले नसते तर या पुलावरून तो थेट सौदीला पोहोचला असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुख्य रस्त्यावर उंटांच्या सुरक्षिततेची कमतरता आहे याबद्दल काळजी वाटते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.