(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला अनेक नवनवीन आणि मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होताना दिसून येतील. अशातच आता एक भयंकर व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे. हा व्हिडिओ एका मगरीचा असून यात तिची विशालकाय प्रतिमा आता सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवत आहे. मगरीचा आकार आणि तिचे शरीर कसे असेल हे साधारण आपण आपल्या मनात ठरवून ठेवलेले आहे पण आताच्या व्हिडिओमध्ये मात्र एक अनोखी आणि सर्वात खतरनाक अशी मगर आढळून आली जिचा आकार नेहमीच्या आकाराहून फार वेगळा होता. तिच्या विशाल शरीराने आणि अनोख्या भयंकर रूपाने व्हिडिओला आणखीनच लक्षवेधी बनवले. चला सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दिसून येणारी ही मगर २० फुटांहून अधिक लांब आहे आणि तिला ‘पोर्ट ब्लेअर जायंट’ असे नाव देण्यात आले आहे. ही मगर अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये दिसून आली. तिचा आकार इतका अफाट मोठा होता की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला. ही इतकी मोठी मगर दिसणे खरंतर फार मगर दुर्मिळ आहे. तथापि, वन विभाग किंवा शास्त्रज्ञांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
खाऱ्या पाण्यातील मगरी साधारणपणे १४-१७ फूट लांब असतात, परंतु काही विशेष प्रकरणांमध्ये त्या २० फुटांपेक्षा जास्त असू शकतात. अंदमानमधील बंगालचा उपसागर प्रवाळ खडक आणि सागरी जीवनाने भरलेला आहे, जो मगरींसाठी अनुकूल आहे. हा परिसर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून इतका मोठा मगर दिसणे असामान्य नाही. दरम्यान अंदमानमध्ये शेकडो मगरीचे वास्तव आहे अशात लोकांची सुरक्षा आणि मगरींचे संरक्षण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. अंदमानमध्ये मगरींचे व्यवस्थापन करण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू आहेत. जर ‘पोर्ट ब्लेअर जायंट’ खरीच इथे दिसून आली असेल तर त्याचे संरक्षण करणे आणि लोकांना सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान असेल.
This 20 foot plus giant crocodile seen in Port Blair, India
It is a MONSTER 😮🤯 pic.twitter.com/Z1QX914d6A
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 11, 2025
मगरीचा हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “राक्षस?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कल्पना करा जर तुम्ही त्याच पाण्यात असाल तर तुमचे काय होईल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भारतात काहीही घडू शकतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.