(फोटो सौजन्य: Twitter) (
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज व्हायरल होतात. यात कधी हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल होतात कधी अपघाताचे तर कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर केले जातात. तसेच इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओतही शेअर केले जातात. हे व्हिडिओ अनेकदा लोकांना लोकांचे मनोरंजन करतात ज्यामुळे कमी वेळात ते व्हायरल होतात. हे दृश्य लोकांसाठी रोमांचक ठरतात ज्यामुळे लोक ते वेगाने शेअर करू लागतात. आताही प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्राणी कितीही क्रूर असले तरी त्यांनाही प्रेम आणि आपुलकी आवडते. सिंहाच्या पिलाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो खूपच गोंडस आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की, केवळ आपण माणसेच नाही तर प्राण्यांनाही या बदल्यात प्रेम कसे द्यायचे हे माहित आहे. जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे तर आता सिंहाच्या गोंडस पिल्लाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून आता अनेकजण सुखावले आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, यात एक सिंहाचा गोंडस पिल्लू केअरटेकर पाहताच खुश होतो आणि त्याच्या कुशीत जाऊन बसतो. केअरटेकरने यावेळी मास्क घातलेला असतो तर हे पिल्लू वारंवार हा मास्क काढत केअरटेकरच्या चेहऱ्यावर चाटतो आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागतो.केअरटेकरला पाहिल्यानंतर त्याचा आनंद पाहण्यासारखा आहे. त्याने केअरटेकरला इतके घट्ट पकडलेले असते की त्याला पाहून असे वाटते की एक क्षणही तो त्याला दूर जाऊ देणार नाही. यावेळी पिल्लाचे सुंदर रूप आणि निरागस डोळे तुम्हाला सुखाहून जातील.
Lion cub loves his caretaker..🦁😊❤️ pic.twitter.com/HrPMQu4d8w
— 𝕐o̴g̴ (@Yoda4ever) February 14, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Yoda4ever नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंहाला त्याचा केअरटेकर फार आवडतो’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सिंहाचे शावक त्याच्या काळजीवाहूबरोबर असे बंधन पाहणे अविश्वसनीय आहे! ते खोल आपुलकी आणि विश्वास विकसित करू शकतात. हे पाहणे मनाला आनंद देणारे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो पाहा कसा त्याचा मास्क काढू पाहत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.