माणुसकी संपली? भररस्त्यात पाळीव श्वानाला सोडून मालक पळाले; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, हृदयद्रावक VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल
खरे तर पाळीव प्राणी हे आपल्या घरातील सदस्यांसारखेच असतात. माणसांप्रमाणेच ते देखील आपल्याला जीव लावतात. कुत्रा तर सर्वात ईमानदार प्राणी मानला जातो. पण काही लोलक या निष्पाप प्राण्यांशी असे वागतात जे पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल. सध्या व्हायरल होत असलेला एका व्हिडिओ निर्दयी मालकाने श्वानाला रस्त्याच्या मधोमधच सोडून दिले आणि गाडीतून तिथून पळ काढला आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक गाडी रस्त्याच्या मधोमध येऊन थांबते. यानंतर त्यातून एक महिला दरवाजा उघडून थोडी बाहेर येऊन श्वानाला बाहेर सोडते. श्वानाला त्याच्यासोबत काय घडले हे समजण्याआधीच कारचा दरवाज बंद होतो आणि कार तिथून निघून जाते. श्वान त्या गाडीच्या पाठीमागे जीवाच्या आकांताने धावत सुटला आहे. पण निर्दयी मालक गाडी थांबवत नाही.
🚨 VIRAL: A video allegedly shows a woman abandoning her pet dog in the middle of a road before driving away. The dog is seen running after the car for a considerable distance, but the vehicle never stops. The clip has sparked widespread outrage on social media, with many… pic.twitter.com/SReh6QCe3P — indiainlast24hr (@indiain24hr) July 13, 2026
सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @indiain24hr या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर एखाद्या प्राण्याचा जन्मभर सांभाळ करणार नसाल, तर त्यांना पाळूच का असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने त्या मालकाला शोधून त्याला कडक शिक्षा द्या असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही. मात्र, या निर्दयी कृत्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






