(फोटो सौजन्य: Instagram)
भारताचा शेजारील देश पाकिस्तानमधून नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव होता. या काळातही पाकिस्तानमधून विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात आले. दरम्यान सध्या पाकिस्तानच्या रुग्नालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये हॉस्पिटल स्टाफ आणि एका रिपोर्टरमध्ये वादावादी झाल्याचे दिसून येते, ज्यांनंतर स्टाफ मेंबर रिपोर्टरच्या अंगावर धावून येतो आणि जोरदार कानशिलात लागवतो. यानंतर तो इथेच थांबत नाही तर एकामागून एक चापट मारत रिपोर्टरची धुलाई करायला सुरुवात करतो. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
मुलीवर हल्ला करताच ढाल बनून पुढे आली आई; गायीचा हल्ला आपल्या अंगावर घेतला अन्… Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर रिपोर्टिंग करताना दिसून येत आहे. दरम्यान, रिपोर्टर त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारण्यासाठी थांबवतो. दरम्यान, तो माणूस रिपोर्टरच्या कानाखाली मारतो. यानंतर, तिथे मोठा गोंधळ होतो आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि रिपोर्टरमध्ये हाणामारी होते. दोघांमधील ही हाणामारी तेथील एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. दरम्यान सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आणि शेअर केल्याचे दिसून येत आहे. व्यक्तीने रिपोर्टरला ज्याप्रकारे मारले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
Kalesh b/w a Reporter and Hospital Staff, Pakistan
pic.twitter.com/ahcIKaF855— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 15, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रिपोर्टर आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्यात कलेश, पाकिस्तान” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लढण्यासाठी रुग्णालयापेक्षा चांगले ठिकाण काय असू शकते, तिथे उपचारही केले जातील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पहिली थप्पड तर जबरदस्त होती…! फट्ट हे शॉट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.