(फोटो सौजन्य: X)
कर्म हे फिरून आपल्याकडे परत येतेच. आपण जे चांगलं, वाईट करतो ते आपल्यासोबतही तसंच घडत. आपण जे काही करतो त्याचे फळ आपल्याला देव देतो हे आपण अनेकदा ऐकले असेलच पण याचे जिवंत उदाहरण तुम्ही पाहिले आहे का? इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात एका व्यक्तीने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला काही क्षणातच मिळाल्याचे दिसून आले आहे. एका स्कॉर्पिओ कारचालकासोबत हा प्रकार घडून आला. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक स्कॉर्पिओ चालक वेगाने सायकलवरून शाळेत जाणाऱ्या मुलाला भिजवल्याचे दिसून आले आहे. पण पुढेच त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते. भारतातील रस्त्यांचा आणि त्याच्या ड्रेनेज सिस्टीमचा आदर करत, जर तुम्ही पावसाळ्यात चारचाकी किंवा दुचाकी चालवत असाल, तर सायकल चालवणाऱ्या किंवा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांची विशेष काळजी घ्या.व्हायरल व्हिडिओमध्ये, स्कॉर्पिओ चालक पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून पूर्ण वेगाने गाडी चालवत पुढे जाताना दिसून येतो. त्याच्या तीव्र वेगामुळे खड्यातून गाडी नेताना तो मुलाला पूर्णपणे भिजवून टाकतो, यामुळे मुलगाही जरा शॉक होतो आणि रस्त्यातच आपली सायकल थांबवतो. पण पुढेच आपण पाहतो की, अवघ्या काही सेकंदातच स्कॉर्पिओ चालकाचाही तोल ढासळतो ज्यामुळे त्याची गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेताकडे वळते आणि खड्ड्यात जाऊन पडते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लोक आला कर्माची जोड देऊन त्याच्या कर्मामुळेच हे घडल्याचं म्हणत आहेत.
I know the daily life is frustrating, but it has its share of satisfying moments as well. pic.twitter.com/sWee5aGQzn
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) July 28, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर देवाने अशा प्रकारे इन्स्टंट कर्माची सेवा करायला सुरुवात केली तर पृथ्वी किती चांगली होईल.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी कर्मावर कधीच विश्वास ठेवला नसता, जोपर्यंत मी हे पाहिलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती गाडी खड्ड्यात पडण्याची पद्धत मला खूप आवडली. खरोखरच तो यासाठी पात्र होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.