जन्माची अद्दल घडली! चोरी करायला गेला अन् धपकन पडला! चोरट्याची अशी फजिती झाली की...; VIDEO पाहून पोट धरुन हसाल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑर्केस्ट्रात तुफान राडा! डान्सरला उचलून पळवण्याचा तरुणाचा प्रयत्न; भर कार्यक्रमात थरार, VIDEO VIRAL
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रात्रीचा वेळ दिसत आहे. रस्त्यांवर अत्यंत शांतता पसरली आहे. याच वेळी एक चोर अत्यंत सावधगिरीने चोरीच्या उद्देश घेऊन एका घरात शिरताना दिसत आहे. तो सुरुवातील एक भिंत व्यवस्थित पार करतो जास्त उंचीवर जाण्याचा प्रयत्न करतो. सर्त्र शांतता असते. परंतु तितक्यात घराच्या आतून भांडी पडल्याचा आवाज येतो. या आवाजाने घाबरलेला किंवा तोल गेले चोर वरुन खाली उडी मारतो. यामुळे त्याच्या पायाला चांगलीच दुखापत होते. घरात शिरल्यावर नेमंक काय घडंल हे व्हिडिओत दिसत नाही. परंतु परत जाताना चोरटा लंगडत जात असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
ये चोर जिंदगी में दोबारा कभी चोरी नहीं करेगा 🤯🤯🤯 pic.twitter.com/BhlEersaaW — HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) April 28, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांनी चोराची चांगली मज्जा घेतली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आता हा पुन्हा आयुष्यात चोरी करणार नाही, तर दुसऱ्या एकाने अरे याला कोणी वरुन फेकून दिलं काय असे म्हटले आहे. तर एकाने थट्टा उडवत चोरी तर तो नक्कीच करेल, याचे ४० गुण असतात फक्त थोडी विश्रांती घेईल असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






