काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय 'हा' Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिप्सटर संजू चौधरीने डिव्हाईसच्या रिटेल बॉक्सचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून आगामी स्मार्टफोनचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. याशिवाय आगामी डिव्हाईसच्या किंमतीचा खुलासा देखील टिप्सटरने केला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट पाहायला मिळत आहे. या बॉक्सवर फोनची एमआरपी 1,19,999 रुपये लिहीली आहे. (फोटो सौजन्य – Vivo)
अनेक यूजर्सनी पोस्टवर प्रतिक्रिया देत स्मार्टफोनची किंमत खूप जास्त असल्याचे म्हटलं आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्षात हा स्मार्टफोन लाँच होईल, तेव्हा त्याची किंमत आणखी कमी असण्याची शक्यता आहे. सहसा असं पाहिलं जातं की, ब्रँड्स रिटेल पॅकेजिंगवर एमआरपी नेहमी जास्त लिहीतात आणि प्रत्यक्षात मात्र फोनची किंमत कमी असते. टिप्सटरने असा दावा केला आहे की, फोनची लाँच किंमत सुमारे 80 हजार रुपये असू शकते.
Exclusive 💫
VIVO X300 FE (12/256GB) BOX MRP : ₹1,19,999 Specs:
• 6.31” flat 1.5K 120hz OLED
• SD 8 Gen 5
• LPDDR5x + UFS 4.1
• 6500mAh + 90W + 40W wireless
• 50MP IMX921 + 8MP (UW)+ 50MP IMX882 tele
• 50MP front
• IP68/69 The expected launch price could be ₹79,999… pic.twitter.com/h3OneBFIpm — Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) April 28, 2026
आगामी विवो स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 6.31 इंच फ्लॅट 1.5K ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यासोबत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज देखील मिळू शकते.
कॅमेऱ्याच्याबाबतीत हा स्मार्टफोन यूजर्सना दमदार परफॉर्मंस ऑफर करणार आहे. आगामी विवो स्मार्टफोनमध्ये 50MP चा सोनी आयएमएक्स 921 मुख्य कॅमेरा असणार आहे. यासोबतच फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड लेंस, 50MP चा आयएमएक्स 882 टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा देखील असणार आहे. याशिवाय कंपनीच्या आगामी फोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देखील दिली जाणार आहे.






