(फोटो सौजन्य: X)
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन! असं म्हणतात की, मुलींसाठी लग्न म्हणजे एका नव्या आयुष्याची सुरुवात असते. भारतात फार थाटामाटात आणि उत्साहात लग्नसोहळे पार पाडले जातात. याच लग्नात अनेक मजेदार गोष्टी घडून येत असतात, ज्यांचे व्हिडिओज शेअर केले जातात. प्रत्येकाला आपल्या लग्नाची हौस असते, कित्येक महिन्यांपासून लग्नाची तयारी सुरु असते मात्र अशातच काहीवेळा अघटित घडून येत आणि ही सर्व मजा धुळीला मिळते. आजकाल जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत लग्नाची शाश्वती देता येत नाही. लग्नसमारंभातील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका वधूने चालू विवाहसोहळ्यात लग्नाला नकार दिला आणि मग आपल्या बॉयफ्रेंडसोबत ती निघून गेली. याचा व्हिडिओ आता सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.
ही घटना चित्रपटातील कोणत्या सीनहुन कमी वाटत नाही. लग्नाचा मंडप सजवला होता, पुजारी मंत्र म्हणत होते, नातेवाईकांच्या नजरा वधू-वरांवर होत्या आणि वातावरण आनंदाने भरून गेले होते. पण नंतर, सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरत, वधूने असे काही केले ज्याची कोणीही कल्पनाही केली नव्हती. शेवटच्या क्षणी, जेव्हा फक्त सात फेरे शिल्लक होते, तेव्हा वधूने लग्न करण्यास नकार दिला. तिने स्पष्टपणे सांगितले की तिला हे लग्न करायचे नव्हते. कुटुंब, समाज किंवा नातेवाईकांची पर्वा न करता, तिने आपला मुद्दा मांडला. हा निर्णय इतका अचानक आणि जोरदार होता की सर्वांनाच धक्का बसला. अनेकांना आश्चर्य वाटले, तर काहींनी तिच्या धाडसाचे कौतुकही केले.
ही घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बुवनहल्ली गावात घडून आली आहे. पल्लवी नावाच्या मुलीने लग्न अलूर तालुक्यातील रहिवासी वेणुगोपालशी निश्चित झाले होते. मात्र जेव्हा वर मंगळसूत्र हातात घेऊन गळ्यात घालणार तितक्यात ती लग्नाला नकार देते आणि सर्वत्र शांतता पसरते. मुलीच्या पालकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, नातेवाईकांनीही आपापल्या पद्धतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पल्लवीने कुणाचेही काही ऐकले नाही आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत तिने येथून पळ काढला.
Karnataka: Bride Pallavi refused to marry at the last moment, saying she loves someone else.She walked out of the wedding venue with her lover under police protection pic.twitter.com/6JbaeHhd2z
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 24, 2025
ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. घटनेच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.8 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एवढ्या शेवटपर्यंत ती का थांबली होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चेहरा का झाकायचा? ती सर्वत्र भारतीय मुलींसाठी एक उत्तम उदाहरण मांडत आहे. कधीही न होण्यापेक्षा उशिरा बरे – तिने जे बरोबर होते ते केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.