कुणाल कामराच्या 'ठाणे की रिक्षा' गाण्यावर Memes होतायेत व्हायरल; युजर्स म्हणाले, "व्वा बेटे व्वा, मोज कर दी"
सध्या सोशल मीडियावर कुणाल कामरा हा विषय फार चर्चेत आहे. कुणाल कामरा हा एक कॉमेडियन आहे जो आपल्या वादग्रस्त कॉमेडीमुळे नेहमीच अडचणीत पडतो. यावेळी त्याने स्टँडअप कॉमेडी करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. यापैकी एकनाथ शिंदे यांचा गट सध्या भाजपासोबत युती सरकार चालवत आहे, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहेत. कुणाल कामराने नुकतेच आपल्या एका शोमध्ये याबाबत एक मिश्किल व संतापजनक असे भाष्य केले. यामध्ये त्याने देशाच्या राजकारणावर हल्ला केला ज्यामुळे त्याला वादांना समोरे जावे लागले.
कुणाल कामराने त्याच्या यूट्यूब चॅनलवर कॉमेडी शोचा व्हिडिओ अपलोड केल्याने शिंदे गटातील कार्यकर्ते त्याच्यावर चांगलेच संतापले आणि त्यांनी कुणालच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर कुणाल कामराला सतत टार्गेट केले जात असून कुणाल कामरा जिथे दिसेल तिथे तोंड काळे करून बदला घेतला जाईल असे बोलले जात आहे. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत.
#Kunalkamra right now : pic.twitter.com/p65sR3jaXV
— Raja Babu (@GaurangBhardwa1) March 23, 2025
सध्या व्हायरल होत असलेल्या या मिम्समध्ये तुम्हाला अभिनेता बॉबी देओल घरात घुसताच दरवाजातील अनेक लॉक्स लावताना दिसेल. कुणीही घरात घुसण्याचा प्रयत्न करू नये म्हणून एकाच दरवाजाला इतके लॉक्स लावले असावे तर कुणालवरही अशीच काही वेळ आल्याची प्रतिक्रिया लोक या मिम्सद्वारे देत आहेत
#kunalkamra pic.twitter.com/XxgZgMcbkO
— Krundi (@Krundi_in) March 24, 2025
दुसरे जे मीम व्हायरल होत आहे त्यात एक व्यक्ती बोटीच्या मदतीने समुद्राचा प्रवास करताना दिसून येत आहे तर कुणाल देखील आपला जीव वाचवण्यासाठी असेच काही करण्याचा विचार करत असावा अशी प्रतिक्रिया लोक यावर व्यक्त करत आहेत
#kunalkamra agar road par dikh gaya to 🤣🤣 pic.twitter.com/r2PvHMWb7b
— Raja Babu (@GaurangBhardwa1) March 24, 2025
आणखीन एक मीम इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात पोलीस एका बाइकस्वाराला पळत पळत पकडताना दिसून येत आहेत तर कुणाल बाहेर पडताच त्याच्यावरही अशीच वेळ येईल असे लोकांचे मत आहे.
असे अनेक मिम्स सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. लोक कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने म्हटले आहे, “L लागले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुणाल कामरासाठी मुंबई सोडणेच बरे. त्याने अखेर एक गंभीर चूक केली आहे, जी बऱ्याच काळापासून होत होती”.
🤡🙏🏻hum seekh gye pic.twitter.com/CdgJ6HaFm6
— Khushi (@Khaa_ma_khaa) March 24, 2025
Samay Raina to Kunal kamra #kunalkamra pic.twitter.com/FkVWLbo4V4
— Desi Bhayo (@desi_bhayo88) March 23, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.