(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे नेहमीच अनेक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे अनेक असे प्रकार शेअर केले जातात जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसणार आहे. अलिकडेच सोशल मिडियावर एक हादरवणारे दृश्य शेअर करण्यात आले आहे जे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विचित्र पायासह रस्त्यावर उभा असल्याचे दिसते. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी यात व्यक्तीचा एक पाय माणसांप्रमाणे दिसत असतो तर दुसरा पाय हा बकरीच्या पायासारखा… व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, स्वत: डाॅक्टरांनी व्यक्तीला हा बकरीचा पाय लावला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर बकरीचा पाय असणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. यात माणसाचा एक पाय इतरांप्रमाणे सामान्य दिसून येत आहे तर गुडघ्याखालील त्याचा दुसरा पाय हा बकरीच्या पाण्याप्रमाणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की, डॉक्टरांनी प्रत्यक्षात या रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया केली. रुग्ण पूर्णपणे चालण्यास असमर्थ होता आणि डॉक्टरांनी त्याच्या अद्भुत बुद्धिमत्तेचा वापर करून रुग्णाला बकरीचा पाय बसवला. व्हिडिओतील या दृश्यांना पाहून आता यूजर्स मात्र हादरुन गेले आहेत. अनेकांनी हे दृश्य बनावटी असल्याचे म्हटले तर काहींनी व्यक्तीविषयी सहानुभूती व्यक्त केली.
हा व्हायरल व्हिडिओ @success.slogans नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका दुर्मिळ आजारामुळे त्याचा पाय गमावल्यानंतर, एका माणसाला अनपेक्षित उपाय सापडला कारण डॉक्टरांनी तो बकरीच्या पायाने बदलला. ऑपरेशन यशस्वी झाले आणि आता तो सहजतेने चालतो, वैद्यकीय जगाला आणि त्याला पाहणाऱ्या सर्वांना ही घटना आश्चर्यचकित करते’. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या जगात अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येत असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण बनते आणि हा व्हिडिओ त्यातीलच एक ठरतो. ही घटना नक्की कुठली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






