(फोटो सौजन्य: instagram)
वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे, ज्यामध्ये जंगलाचा राजा, सिंह आणि धोकादायक कोब्रा यांच्यात सामोरासमोर आल्याचे दिसून आले आहे. आता सिंह आणि कोब्रा हे दोघेही जंगलातील सर्वात धोकादायक शिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्याच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर झाले आहेत मात्र हे दोन शिकारी आमने-सामने येण्याची ही जणू पहिलीच वेळ.
व्हिडिओमध्ये, सिंह आणि कोब्रा सामोरासमोर आल्याचे दिसते. त्यांचे असे एकत्र समोर येणे एक मनोरंजक वळण घेते जे पाहून सर्वच हैराण होतात. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक किंग कोब्रा ढिगाऱ्यावर फणा पसरवून बसलेला दिसत आहे. तो सिंहाकडे टक लावून पाहत आहे आणि जसा सिंह त्याच्याकडे सरकतो तसतसा कोब्रा आपला फणा आणखी पसरवून सिंहाला आव्हान देतो. हे दृश्य एक रोमांचक क्षण असल्यासारखे वाटते, कारण कोब्राची धोकादायक वृत्ती असूनही, सिंह देखील त्याकडे पाहतो. पण सिंहाला कोब्राची ताकद लक्षात येताच तो घाबरतो आणि मागे हटतो. हे दृश्य कोणत्याही वन्यजीव प्रेमीसाठी एक मनोरंजक आणि साहसी अनुभव आहे.
पंछी बनू उडता फिरू…! चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Viral
व्हिडिओच्या शेवटी, सिंह काही काळ कोब्राभोवती घिरट्या घालतो, परंतु शेवटी समजते की या धोकादायक कोब्राचा सामना करणे योग्य होणार नाही. सिंह मग हळू हळू मागे सरकतो आणि तेथून पळ काढतो. जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी घाबरून गेल्याचे पाहताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे दृश्य जंगलातील अनोखे रूप दाखवून जाते ज्याचा आपण कधीही विचार केला नसावा. सिंह देखील वेळ पडल्यावर आपली हार मानू शकतो आणि वेळ पडल्यावर आपला जीव वाचवणे हे आपले पहिले कर्तव्य असले पाहिजे हे यातून आपल्याला शिकायला मिळते.
सिंह आणि कोब्राचा हा व्हायरल व्हिडिओ @heavenly_nature_1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंह पळून गेला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला भाजतो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “विष कोणतेही असो, त्याच्यापुढे राजा किंवा सत्ता बेकार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही भीती नाही तर शहाणपण आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.