(फोटो सौजन्य: Instagram)
भारतातील आग्रा येथे वसलेले ताजमहाल जगातील सातवे आश्चर्य आहे. पत्नी मुमताजच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ मुघल बादशाह शाहजहानने याची उभारणी केली. पांढऱ्या संगमरवरी दगडाने बांधलेला हा महल जगभरात लोकप्रिय आहे. दरवर्षी हजारो पर्यटक याला पाहण्यासाठी दूरदूरवरून आग्र्याला येत असतात. अशातच आता मध्य प्रदेशातील एका घराची प्रतिमा सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. यात एका उद्योगपतीने मुघल बादशाह शाहजहानचा आदर्श घेत हुबेहूब ताजमहालसारखे दिसणारे घर बांधले आहे. कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वतने या सुंदर घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे जी जोरदार व्हायरल होत आहे. यात त्याने घराच्या मालकाशी संवादही साधला आहे.
आनंद प्रकाश चौकसे हे एक उद्योगपती असून त्यांनी आपल्या पत्नीसाठी हुबेहूब राजमहालसारख्या दिसणाऱ्या घराची उभारणी केली. त्यांनी सांगितले की, घर थंड ठेवण्यासाठी या घरात दुहेरी भिंती बनवल्या आहेत. घर थंड राहावे म्हणून दोन्ही भिंतींमध्ये २ फूट अंतर ठेवण्यात आले आहे. हा ताजमहाल हा ४ बीएचकेचे एक घर आहे. ताजमहालप्रमाणेच हे घर देखील मकराना संगमरवरापासून बनले गेले आहे. मूळ ताजमहालमध्ये जे काही बांधकाम मीटरमध्ये आहे ते या घरात फूटमध्ये आहे.
आनंद प्रकाश चौकसे म्हणाले की त्यांचा ताजमहाल त्यांच्या पत्नीला समर्पित आहे. या घरात प्रवेश करताच नक्षीकाम आणि कोरीव कामाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते जे सर्वांना आश्चर्यचकित करण्यासारखे आहे. घरात प्रवेश करताच जमिनीवर एका म्हशीचे चित्र रेखाटण्यात आले आहे. या घराचे मालक आनंद प्रकाश चौकसे यांनी सांगितले की त्यांनी त्यांचे बालपण प्राण्यांमध्ये घालवले, म्हणून म्हशीचे हे चित्र त्यांना गर्विष्ठ न होण्याची आठवण करून देते.
घरात एक ग्रंथालय आणि मेडिटेशन रूम देखील आहे. पायऱ्या चढून गेल्यावर घराचा घुमट देखील दिसतो. संपूर्ण घर बांधण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच वेळ घुमट बांधण्यासाठी लागला असे सांगण्यात आले. हा 4BHK ‘ताजमहाल’ एका मोठ्या निवासी शाळेच्या आवारात बांधला गेला आहे. आनंद प्रकाश चौकसे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि शिक्षणाच्या कामात गुंतलेले असतात. ते म्हणतात की त्यांनी अभियांत्रिकी सोडली आहे तर त्यांच्या पत्नीने वैद्यकीय शिक्षण सोडले असून त्या आता समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी भारतातील सर्वात हाय-टेक गुरुकुल बांधले आहे.
याचा व्हायरल व्हिडिओ @priyamsaraswat नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत याला लाखो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच अनेक युजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पतीच्या या प्रेमावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “काकांचे मन त्यांच्या महालापेक्षाही सुंदर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला घरापेक्षा ते जोडपे जास्त आवडले, अद्भुत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.