बिहारमधील भाजप उमेदवार मैथिली ठाकुर हिने पागमध्ये टाकून मखाना खाल्यामुळे ट्रोल होत आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maithili Thakur Makhana In Paga: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार सुरु असून उमेदवारांची लगबग सुरु आहे. उमेदवार दिवसरात्र एक करुन मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. तहान-भूक विसरुन हा प्रचार सुरु असून निवडणुकीची रंगत वाढली आहे. मात्र भुकेच्या नादामध्ये भाजप उमेदवार मैथिली ठाकुर हिने बिहारींचा मोठा अपमान केला आहे. बिहारी पगडी अर्थात पागमध्ये मैथिलीने मखाना खाल्ले आहेत. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून सोशल मीडियावर मैथिली ठाकुर प्रचंड ट्रोल होत आहे.
बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फार कमी वेळ शिल्लक आहे. या निवडणुकांपूर्वी, मिथिलाचा अभिमान मानल्या जाणाऱ्या “पगडी” ने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या केतकी सिंह यांच्या पगडी फेकण्याच्या घटनेवरील वाद काहीसा शांत झाला नव्हता तेव्हाच मैथिली देखील या वादामध्ये अडकल्या आहेत. दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मैथिली ठाकूर यांचा मखाना खाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी मिथिलाचा अभिमान मानल्या जाणाऱ्या पागमध्ये मखाना भरुन खाल्ले आहेत. यावरुन नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा अपमान असल्याचे वक्तव्य केले.
बिहार राजकारणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
मैथिली ठाकूरचा हा व्हिडिओ कालच्या कार्यक्रमानंतर काढण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एनडीए प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ता परिषदा आयोजित करत आहे. काल, २२ ऑक्टोबर रोजी, दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे मैथिली ठाकूर देखील भाजपच्या उमेदवार आहेत. कार्यक्रमानंतर लोकांनी प्रेमाने तिला मखाना खाण्यासाठी दिला. यावेळी मैथिलीच्या संपूर्ण तोंडामध्ये मखाना भरला होता. त्यानंतर तिच्या हातामध्ये असलेल्या पगामध्ये मैथिलीने मखाना भरुन घेतला.
थैंक यू मैथिली ठाकुर आज आपने पूरे मिथिला को पाग का सही उपयोग करना सिखाया । पाग को मखान बॉक्स के रूप में प्रयोग करना अति मनभावन है। आप इसमें डाल कर समोसा खाओ, आप इसमें भुजा खाओ आपका जी करे तो इसे डस्टबिन बना डालो। अरे पाग ही तो है इसे हवा में उछाल दो फेंक दो क्या फर्क पड़ता है।… pic.twitter.com/jMbc5XrU4O — Uday Chatterjee (@UdayChatterje) October 23, 2025
मखाना घेऊन मैथिली ठाकूर तिच्या गाडीत बसली आणि लोकांशी बोलू लागली. यावेळी तिने मखाना तिच्या पगडीत ठेवला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. पगा ही बिहारमधील पगडी अत्यंत मानाची मानली जाते. मैथिली ठाकुरने यामध्ये मखाना ठेवून तिचा अपमान केला असल्याची भावना बिहारी लोकांनी व्यक्त केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप आमदार केतकी सिंह यांचा व्हिडिओही व्हायरल
भाजप आमदार केतकी सिंह यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पगडी फेकताना दिसत आहेत. तथापि, वाद वाढल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, “पगा ही केवळ माझ्यासाठीच नाही तर जगातील कोणत्याही भारतीयासाठी सन्मानाची बाब आहे. आपण सर्वजण त्याकडे आदराने पाहतो.”
पागवरुन वाद का?
खरं तर, मिथिला प्रदेशात पगडी ही सामान्य वस्तू नाही; प्राचीन काळापासून ती मिथिलाचा अभिमान मानली जात आहे. ती फक्त एक सामान्य शिरपेच नाही; या प्रदेशातील लोक ती त्यांच्या संस्कृतीचे आणि सन्मानाचे सर्वात मोठे प्रतीक मानतात. मिथिलामध्ये एक म्हण आहे की, “पगडी, पान आणि मखाना, हा मिथिलाचा सन्मान आहे.” शिवाय, भारत सरकारने २०१७ मध्ये मिथिला पगडीवर टपाल तिकिट जारी केले.






