(फोटो सौजन्य: Twitter)
जंगलातील एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये जंगली म्हशीचे सिंहाची हवा टाइट केल्याचे दिसून आले. सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. इथे माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. प्राण्यांच्या आयुष्याशी निगिडीत असे हे व्हिडिओ लोक मजा घेऊन पाहतात त्यामुळे कमी वेळातच ते व्हायरल होतात. आता हेच पहा ना जंगलातील आणखीन एका लढतीचा थरार इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात म्हैस आणि जंगलच्या राजामध्ये झालेल्या लढतीचे दृश्य दिसून आले, जे आता अनेकांना थक्क करत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकता, यात एक सिंह म्हशीला बघताच तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र सिंहाला पुढे जाऊन याची मोठी किंमत चुकवावी लागते. व्हिडिओत पुढे दिसते की, काही क्षणातच दुसरी एक म्हैस वेगाने पळत तिथे येते आणि सिंहावर हल्ला करू लागते. आपला साथीदार सिंहाच्या तावडीत अडकलेला पाहताच क्षणाचाही विलंब न लावता ती म्हैस सिंहाला आपल्या शिंगांनी पकडते आणि जमिनीवर आपटते. हे दृश्य इतकं दमदार होतं की लोक ते पाहून आश्चर्यचकित झाले.
वास्तविक सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याच्या बलाढ्य शक्तीपुढे मोठमोठे प्राणीही त्याच्यासमोर नतमस्तक होतात. सिंहाची दहशहत फक्त जंगलातच नाही तर मानवी वस्तीतही तितकीच पाहायला मिळते. अशात व्हिडिओतील सिंहाचे हाल पाहून अनेकांना धक्का बसला. दुसऱ्या म्हशीने सिंहावर इतक्या क्रूरपणे हल्ला केला की तिने त्याला आपल्या शिंगासह हवेत फेकले. म्हशीला आपली शिकार मानणारा सिंह एका क्षणात हवेत लटकला. म्हशीने आपल्या शिंगाने असा हल्ला केला की सिंहाची सारी शक्ती निकामी झाली. यानंतर सिंहाने आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढणेच योग्य मानले. एका म्हशीने सिंहाचा कसा पराभव केला हे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत. पहिल्या म्हशीनेही या संधीचा फायदा घेत पळ काढला आणि दोन्ही म्हशी सुरक्षित राहिल्या.
great save 😇 pic.twitter.com/hgJH6jDRMG
— Shah Rukh Khan (@imsrkmp) December 22, 2024
म्हैस आणि सिंहातील या थरारक चकमकीचा व्हिडिओ @imsrkmp नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी ऐकलं की यांनतर सिंह शाकाहारी झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला लागले असावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.