(फोटो सौजन्य: X)
जंगल हे निसर्गाने समृद्ध असलं तरी इथे प्राण्यांचे राज्य चालते आणि या राज्याचा राजा म्हणजे सिंह! आपले ताकदीमुळे सिंहली जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. हा एक असा शिकारी आहे ज्याला पाहताच अनेकांना घाम फुटू लागतो. प्राणीच काय तर माणसांसाठीही हा प्राणी फार धोकादायक ठरतो अशात सिंहाचा एक मजेदार व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यात सिंह निरागस चेहऱ्याने जंगल सफरी करणाऱ्या पर्यटकांकडे उत्सुकतेने पाहत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओत पर्यटक सेल्फी काढण्यात मग्न होते मात्र याच वेळी सिंह तिथे येतो आणि त्यानंतर तो जो रिॲक्शन देतो ती आता सोशल मीडियावर लक्षणीय ठरत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सेल्फीचा क्रेझ अजूनही इंटरनेटवर पसरलेला आहे, आपण कुठेही गेलो की सेल्फी काढतोच अशात जंगल सफारी करण्यासाठी आलेले पर्यटक देखील जंगलात आपली जीप थांबवून फोटो काढत होते. व्हिडिओत एक व्यक्ती जीपच्या बोनटवर बसून आजूबाजूचे भान हरपून सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे दिसते आणि याचवेळी मागून तिथे एक सिंह येतो आणि व्यक्तीला सेल्फी काढताना बघतो. आश्चर्याची बाब म्हणजे सिंह व्यक्तीवर हल्ला चढवत नाही तर कुतूहलाने फक्त त्याच्याकडे बघत राहतो. काहीवेळाने व्यक्तीला आपल्या बाजूला जंगलाचा राजा असून तो आपल्याला पाहत आहे हे जाणवते. यानंतर व्यक्तीचा जीव घाबरा होतो आणि हे दृश्य पाहण्यासारखे बनते. मृत्यूला जवळ करत व्यक्ती फोटो काढत होता खरं पण यात शेवटी काय होत ते मात्र स्पष्ट केलं नाही. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र चांगलाचा व्हायरल होत आहे. लोक ही दृश्ये वेगाने शेअर करत असून मोठ्या प्रमाणात याला आतापर्यंत पाहिले गेले आहे.
OMG 🤣 pic.twitter.com/jtyN8AfEjk — The Figen (@TheFigen_) July 6, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पुन्हा एकदा, स्त्रिया पुरूषांपेक्षा जास्त का जगतात ते सिद्ध झाले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे मजेदार होतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिंह विचार करत असेल याला खाऊ की नको खाऊ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.