शेवटी आई ती आईच! बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या राक्षसाशी भिडली हात्तीणी; मगरीवर लाथा मारत हल्ला केला अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंटेट क्रिएशन केले असते. अलीकडे वन्यजीव प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातून प्राण्यांच्या आयुष्यात देखील मानवासारखे संघर्ष असतात हे पाहायला मिळते. तर त्या संकटांवर न डळमळता कशी मात करायची हे शिकायाल मिळते. तसेच आईचे प्रेम हे केवळ मानवच अनुभवत नाही, तर प्राण्यांना देखील त्यांच्या आईचे प्रेम अनुभवायला मिळते.
काय आहे व्हिडिओमध्ये?
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक हात्तीणी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धडपड करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हात्तीणी आपल्या चिमुकल्या सोबत मातीच्या चिखलात खेळत आहे. याच वेळी तिला अचानक कोणत्या तरी संकटाची चाहूल लागते. बाळ पाण्यात पडते आणि त्याला उठता येते नसते. आई हात्तीणीच्या लक्षात येते की बाळावर राक्षसाने हल्ला केला आहे. मगरीने हल्ला केला आहे. यामुळे तिन क्षमाचाही विलंब न करता मगरीवर हल्ला चढवते. मगर लपून बसलेली असेत. यामुळे तिला बाहेर काढण्यासाठी हात्तीणी पाण्यात पायने मारु लागते. यामुळे मगर बाहेर येते आणि पिल्लाचा जीव वाचतो. यावरुन लक्षात येते की आई कोणचाही असो ती आपल्या पिल्लांसाठी आपला जीव धोक्यात घालायला मागे पुढे पहात नाहीत. सतत आपल्या बाळाची रक्षा करत असते.
व्हायरल व्हिडिओ
Mother elephant protecting her calf against crocodile pic.twitter.com/HWMeIl5Uvh
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 13, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheeDarkCircle या अकाउंवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी आई ही आईत असते, तिच्यासारखे दैवत कोणी नाही असे म्हटले आहे. काहींनी हा क्षण मानवाच्या जीवनातील संघर्षातही पाहायला मिळतो. तर काहींनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुमचाही पसंतीस पडेल आणि तुम्हाला तुमच्या आईच्या संघर्षाची नक्कीच आठवण येईल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.