(फोटो सौजन्य: Instagram)
व्हिडिओमध्ये एका पर्यटकाने अद्भूत दृष्य शेअर केले आहे ज्यात आपल्याला एकाच ठिकाणी खाली समुद्र आणि त्याच्यावर एक तलाव पाहता येतो. आता आपल्याला ही घटना काल्पनिक किंवा एआय जनरेटेड वाटेल पण तसं नाहीये. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ठिकाण वास्तवात असून ते उत्तर अटलांटिक महासागरातील डेन्मार्कच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘फारो द्वीपसमूह’मधील ‘वगार’ (Vagar) नावाच्या बेटावर आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओंमध्ये व्यक्ती आपल्या मुलाला पाठीवर घेऊन ठिकाणाचे साैंदर्य दाखवताना दिसला. यात खालच्या बाजूला अथांग निळाशार समुद्र वाहताना दिसतो. तर याच्या वरच्या बाजूला म्हणजेच समुद्रापासून काही अंतर वर उंचावर तलाव असून त्यातील पाणी वाहताना दिसते. आजूबाजूचे वातावरण शांत दिसते, तिथे लोकांची गर्दी अजिबात दिसत नाही. यासोबतच आकाशात काही पक्षे मुक्तपणे झेप घेत असतात. हे संपूर्णच दृष्य कोणत्या स्वप्नवत जगासारखे दिसते जिथे जाण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.
View this post on Instagram
A post shared by 𝗦𝗰𝗼𝘁𝘁 – 𝗵𝗶𝗸𝗶𝗻𝗴, 𝗮𝗱𝘃𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝗲 & 𝘁𝗵𝗲 𝗼𝘂𝘁𝗱𝗼𝗼𝗿𝘀 (@geordieramblers)
हे ठिकाण जगातील सर्वात रहस्यमय आणि विस्मयकारक निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक मानले जाते. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेंकर्ससाठी हे ठिकाण म्हणजे कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. ठिकाणाचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स यातील दृष्ये पाहून थक्क झाले. काहींनी असे ठिकाण खरंच सत्यात आहे का याची खात्री करु पाहिली तरी काहींनी ठिकाणाचे लोकेशन विचारत ते नक्की कुठे वसले आहे असा प्रश्न केला. याचा व्हिडिओ @geordieramblers नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला १.६ दशलक्षाहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत तर सोशल मिडियावर व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “मला हे खूपच आवडलं!!! शिवाय, अरे हे काही AI नाहीये बरं का!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती सुंदर आहे हे! पण अरे बाबा, त्या कड्यापासून दूर हो- मला खूप भीती वाटतेय!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला त्याच्या पाठीवरील त्याचा मुलगा फार गोड वाटला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






