Burning Car : नागपूर हादरलं! भरधाव कारने अचानक घेतला पेट; दरवाजे लॉक झाले अन् पुढं जे घडलं... VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडया)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१८ मार्च ) रात्री ७.३० च्या सुमारास नागपुर वर्धा हायवेवर ही घटना घडली. अजमद खान इब्राहिम आपल्या कारने घरी परतत असातानाता त्यांच्या कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चालकाने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु कारच्या सेंट्रल लॉकिंग सिस्टमध्ये बिघाड झाल्याने दरवाजे बंद झाले. ज्यामुळे अमजदला बाहेर पडता येत नव्हते. परंतु त्यांनी ओढाताण करत शेवटी कारमधून बाहेर उडी मारली. कार तशीच पुढे जळत गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत कारची राख झाली होती. या घटनेमुळे वर्धा हायवेवर बराच काळा वाहतूक खोळंबली होती.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेचा थरारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आहे. रस्त्यावरही बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. उन्हाळ्याच्या दिवसात इंजिन गरम झाल्याने असे स्फोट होण्याची सतत शक्यता असते. हे याचेच एक उदाहरण आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






