(फोटो सौजन्य: Instagram)
एकीकडे जग पुढे जात असताना काही देश मात्र त्याचत्याच जुन्या विचारांमध्ये गुंतून राहिले आहेत. यात भारताचा शेजारील देशा पाकीस्तानचाही समावेश होतो. आम्ही असं का म्हणत आहोत, हे सिद्ध करुन दाखवणाराच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे. देशाची तरुण पिढी देशाचे भविष्य उज्वल करत असतात अशात त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे पण पाकिस्तानमध्ये काही भलतंच घडताना दिसलं. इथे मुलांना विज्ञानाचं ज्ञान दिलं जात नाही तर भीती, अंधश्रद्धा आणि कट्टर विचारसरणी शिकवली जात आहे. विज्ञान आणि तर्कशास्त्राऐवजी, ते ढोंगीपणा आणि भीतीला इथे अधिक प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे मुलांचे भविष्य प्रकाशाकडे वळत नसून अंधकाराकडे त्यांना ढकलत आहे.
पाकिस्तानच्या शाळेचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एक मुलगा आपला प्रोजेक्ट सर्वांसमोरसादर करताना दिसून आला. मुख्य म्हणजे जिथे इतर शाळांमध्ये भविष्यातील बदलांविषयी, प्रगतीविषयी ज्ञान दिले जाते तिथेच हा मुलगा आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्वनाश किंवा जगाच्या अंताचे चित्रण दाखवताना दिसून आला. व्हिडिओमध्ये तो बोलतो, “एक दिवस संपूर्ण जग नष्ट होईल. हे डूम्सडेचे दृश्य आहे. पहा, समुद्रातून ज्वाला उठत आहेत, सूर्य अंधकारमय झाला आहे आणि त्याचा प्रकाश नाहीसा झाला आहे. सर्वत्र विनाश आहे, रस्ते जळत आहेत, इमारती राखेत बदलल्या आहेत. तारे पृथ्वीवर पडले आहेत, ज्वालामुखी लावा सोडत आहेत आणि मृत लोक त्यांच्या कबरीतून उठत आहेत.”
एका लहान मुलाच्या तोंडून असं काही ऐकण सगळ्यांना थक्क करुन ठेवणारं आहे. जगभरातील इतर देश आपल्या मुलांना रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ विज्ञान यासारख्या आधुनिक विषयांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित करत असताना, या पाकिस्तानी शाळेतील मुले भीती आणि विनाशाच्या कल्पनांमध्ये अडकत आहेत. हा व्हिडिओ एकंदरीतच आपल्याला पाकिस्तानची काळी बाजू दाखवून देते जिथे मुलांना लहानपणापासूनच जगाच्या विनाशाचे प्रशिक्षण दिले जाते. हा व्हायरल व्हिडिओ @lnfora360 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे तर गाझा वाटत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर ब्रेनवॉशिंगला चेहरा असता तर ते असेच दिसत असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ईईईई, हा त्यांचा अभ्यासक्रम आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






