रस्त्याच्या मधोमध दिसली 'डेड बॉडी'; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, कधी जुगाड, कधी भांडण अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्याच्या मधोमध असे काही घडलं आहे की, पाहून लोकांची घाबरगुंडी उडालेली आहे. लोकांनी पोलिसांना बोलवलेले आहे. पण यानंतर जे घडलं आहे ते पाहून पोलिस आणि तिथे जमलेल्या लोकांमध्ये हशा फुटला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक पांढरी चादर ओढून माणूस झोपलेला आहे. पण यामुळे लोकांचा मोठा गैरसमज होतो. लोक मृतदेह समजून पोलिसांना बोलवतात. तुम्ही पाहू शकता की लोकांची प्रचंड गर्दी तिथे जमलेली आहे. पोलिस देखील नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी तिथे आलेले आहेत. एक रुग्णवाहिका देखील बोलवण्यात आलेली आहे.
याच वेळी लोकांचा आवाज आणि गोंधळ सुरु आहे. हा आवाज ऐकून ती प्रेतासारखी झोपलेली व्यक्ती अचानक उठलेली तुम्ही पाहू शकता. चादर घेऊन झोपलेली व्यक्ती गोंधळ ऐकून उठते आणि तिथून निघून जाऊ लागते. जसे की काहीच घडलेले नाही. त्या व्यक्तीला त्याच्या आसपास काय सुरु आहे याची देखील कल्पना नसते. परंतु हे दृश्य पाहून काहीजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर काहीजण मोठ्याने हसत आहे. पोलिसांना देखील त्यांचे हसू आवरणे कठीण झाले आहे.
अभिमानास्पद! अमेरिकन मुलाने गायले भारताचे राष्ट्रगीत; व्हिडिओ पाहून कराल कौतुक, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
कितने तेजस्वी लोग हैं 😁
लोग इकठ्ठा हों गए पुलिस भी आ गई सब सोच में पड गये किसी ने कोई लाश फेंक दी है पुलिस भी अपने काम में लग गई एम्बुलेंस को भी फोन करके बुला लिया जब शोर ज्यादा होने लगा तो आदमी उठकर चल पड़ा और बोला तुम लोग ठीक से सोने भी नहीं देते बताओ गलती किसकी हैं। pic.twitter.com/BtBYaOLIr2
— Shivani Sahu (@askshivanisahu) August 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केलेले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ एक्सवर @askshivanisahu या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.