पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO ने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पाषाणमध्ये एका महिलेने फुटपाथवरुन गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांची आरती काढली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताकी, महिला फुटपाथवरुन जाणाऱ्या दुचाकी स्वारांची आरती काढत आहे. या तुमचे स्वागत आहे असा टोला लगावताना ती दिसत आहे. हात जोडत तुमची आरती काढते, असा खोचक टोला या महिलेने लगावला आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भन्नाट अशा शैलीत या महिलेने धडा शिकवला आहे. हा व्हिडिओ पाहून ट्राफिक पोलिस देखील पाहत राहिले असतील. सध्या पुणेकर ताईच्या या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड धुमाकूळ घातला आहे.
पाषाण येथे फुटपाथ वरून गाडी चालवणाऱ्या लोकांची आरती .. 🫡🏍️ pic.twitter.com/3xKftKWHVZ — पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 10, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर, इन्स्टाग्रामवर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एका युजरने त्या महिलेला पला सेल्यूट आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पुणे सिटी ट्राफिक पोलिसांना टॅग करत कृपया जागे व्हा असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने भारतीय नागरिकांचा सिविक सेन्स पाहता मी देखील असे नक्कीच करेन असे म्हटले आहे, तर एका नेटकऱ्याने ताई सिग्नलवर, अवैध पार्किंग करणाऱ्या ठिकाणी, अतिक्रमणाच्या ठिकाणी असेच आरती करत उभे रहा म्हणजे लोक सुधारतील असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






