पुणेकरांचा नाद नाही! अंगापेक्षा बोंगा नंबर प्लेट लावत मारली गावभर फेरी, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Viral News Marathi : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीणे आहे. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये पुण्यातील तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. पुणे तिथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. या प्रत्यय अनेक वेळा तुम्हालाही आला असेल. पुणेकरांच्या गोष्टी, त्यांचे किस्से, पुणेरी पाट्या अशा अनेक गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची तर जगभर चर्चा असते.पुणेकरांनी त्यांच्या शुद्ध बोलण्याच्या सवयीने तर एक वेगळीच छाप सोडली आहे. सध्या एक अंगा पेक्षा बोंगा मोठा अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हायरल होत अससलेल्या व्हिडिओत एक स्कूटीवाल्याच्या नंबर पेल्टवरुन चर्चा सुरु आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका स्कूटीची नंबर प्लेट चार चाकी गाडीच्या नंबर प्लेट सारखी मोठी आहे. सहसा तुम्ही स्कूटीची नंबर प्लेट छोट्या आकारापेक्षा पाहिली असले. पण या पठ्ठ्यांनी त्यांच्या स्कूटीला मोठी नंबर प्लेट लावली आहे. तसेच पुण्याच्या रस्त्यावर फिरताना या स्कूटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रमावर @being_lohagaonkar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “फेक नंबर प्लेट आहे असे म्हटले आहे.” तर दुसऱ्या एका युजरने तरी पण चलाना कट होणार आहे काका असे म्हटले आहे. आणखी एका युजरने कारची नंबर प्लेट बाईकला आणि बाईकची नंबर प्लेट कारला असे म्हटले आहे. तर काहींना काकांचा नाद नाही करायचा असेल म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखीलल शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.