(फोटो सौजन्य: Instagram)
आपल्या देशात धार्मिक गोष्टींचा फार महत्त्व आहे. देशात अनेक देवी-देवता आहेत ज्यांची भाविक रोज पूजा करत असतात. हिंदू धर्मात भगवान शिवाला फार महत्त्व आहे. त्रिमूर्तींपैकी एक सृष्टीच्या संहाराचे त्यांना प्रतीक मानले जाते. लोक दूरदूरचा प्रवास करून देवाच्या दर्शनसाठी लांबच्या लांब रांग देखील लावतात. देवाचे दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त केल्या जातात. देवाच्या मूर्तीची मनोभावनेने पूजा केली जाते आणि यातच आता एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यातील दृश्ये तुमच्या तळपायाची आग मस्तकात आणतील. चला यात काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
ज्या देवाची आपण रोज पूजा करतो, त्याला पुष्प वाहतो, ज्याच्या चरणस्पर्शानेच सृष्टी मोहून गेल्यासारखी वाटते त्याच देवताची व्हिडिओत दुरावस्था झाल्याचे व्हिडिओत दिसून आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक व्यक्ती नाचत असल्याचे दिसून येते. यावेळी त्याच्यासमोर भगवान शंकराची मूर्ती असतो. डोळ्यात गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि नाचत नाचत तरुण चक्क शंकराच्या मूर्तीला चप्पलांचा हार घालतो. हार घातल्यानंतरही तो थांबत नाही तर पुन्हा भगवान शंकराच्या मूर्तीकडे हात करत नाचू लागतो. हे सर्वच दृश्य फार धक्कादायक असून देवाचा असा अपमान झाल्याचे पाहून भाविक आता दुखावले गेले आहेत तर अनेक युजर्स व्हिडिओवर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
ऑनलाईन सुरु होती हाय कोर्टची सुनावणी, व्यक्तीने टॉयलेटमध्ये हलकं होत ऑन केला कॅमेरा; Video Viral
संतापजनक ठरणारा हा व्हिडिओ @sachettandonofficialfan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून काहींनी व्हिडिओवर कमेंट करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा लोकांना काहीही होत नाही, ते आपल्यासारख्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्रास देतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विनाशकाली विपरित बुद्धी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कदाचित आपल्याला काहीही करण्याची गरज नाही, फक्त देवावर सोडा, तो आपल्यापेक्षा चांगले काम करेल.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.