लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका वर्गात दोन शिक्षक चुंबन घेताना दिसत आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, शिक्षक आजूबाजूला कोणा नसल्याचे पाहत आहेत. यानंतर दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित पुरुष शिक्षक आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या ४ वर्षापासून कोर्टात खटला सुरु होता. पतीचे शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. याच संशयावरुन पुरावे गोळा करण्यासाठी पत्नीने छुप्या पद्धतीने शाळेच्या वर्गात एक हिडन कॅमेरा सेट केला होता. यानंतर तिने व्हिडिओ सोशल मीडियावर लीक केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षण विभागाने तातडीने दोन्ही शिक्षकांना निलंबित केले आहे.
गुरुजी ने स्कूल के क्लासरूम को ही , रोमांस रूम बना दिया… और पूरी कहानी CCTV में रिकॉर्ड हो गई! 😅 वीडियो यूपी के कन्नौज का बताया जा रहा है!#Viral #trending #school #UP #UttarPradesh #ViralVideo #CCTV #GovernmentSchool #School #Teacher #Teachers #Education #BreakingNews… pic.twitter.com/Mfvrsq62pm — Md Afzal Alam (@afzalalamjmi) July 15, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @afzalalamjmi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला. शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकारचे लज्जास्पद आचरण सहन केले जाणार नाही असे लोकांनी म्हटले. गावकऱ्यांनी यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






