Tehran Wedding : आंदोलकच बनले वऱ्हाडी! युद्धाच्या धामधुमीत इराणमध्ये रंगला लग्नाचा सोहळा, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जन्माची अद्दल घडली! चोरी करायला गेला अन् धपकन पडला! चोरट्याची अशी फजिती झाली की…; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून तेहरानमध्ये निदर्शने सुरु आहेत. यामुळे सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. या दरम्यान रविवारी (२६ एप्रिल) एका जोडप्याने आपला लग्न सोहळा उरकून घेतला आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात आंदोलकच वऱ्हाडी बनले आहेत. युद्धाच्या सावटात या जोडप्याने एकमेकांचा हात धरला आहे. आंदोलकांनी हातातील फलक खाली ठेवून टाळ्यांचा कडकडात नवविवाहित जोडप्याचे स्वागत केले आहे. त्यांना आशिर्वाद दिला आहे. अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
ما تا آخرین نفس، پاسدار عزت، امنیت و سربلندی میهنمان هستیم و در برابر هر تهدیدی، یکصدا و استوار خواهیم ایستاد. این زوج جوان نیز با عشق به وطن و ایمان به آرمانهای انقلاب، آغاز زندگی مشترکشان را با عهدی از وفاداری، همدلی و استقامت رقم زدهاند. pic.twitter.com/436iHGRJqz — ریحانه (@rynh245752) April 27, 2026
युद्धाच्या परिस्थिती हा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला असून एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे. विशेष म्हणजे केवळ एका जोडप्याने नव्हे तर आणखी काही जोडप्यांनी देखील लग्न केले आहेत. नागरिकांच्या मते, हा विवाह राजकीय तणावाविरोधातील शांततेचा पुकार आहे. हे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून, तेहरानच्या जनतेची शांततेसाठी असलेली तडफड आणि सामान्य आयुष्याकडे परतण्याची ओढ दाखवणार क्षण आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






