(फोटो सौजन्य: X)
जंगलाचा एक नियम आहे, इथे तोच टिकून राहते ज्याच्याकडे लढण्याची शक्ती आहे. कमकुवत प्राण्यांचा जंगलाच निकाल लागत नाही, त्यांची फार सहज शिकार केली जाते. यातही सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो, त्याच्यापासून संपूर्ण जंगल घाबरलेलं असतं आणि अशातच आता जंगलाची राणी म्हणजेच काही सिंहीणींची शिकार सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये तब्बल तीन सिहींणींनी एका भल्यामोठ्या जिराफावर हल्ला चढवल्याचे दृश्य दिसून येते. विशेष म्हणजे जिराफ हा प्राणी उंचीने फार मोठा असतो ज्यामुळे त्याची शिकार करणं थोडं कठीण जातं पण सिहीणींनी आपल्या बळाचा आणि एकजुटीचा फायदा घेत ज्याप्रमाणे त्याला शिकार बनवलं ते खरंच लक्षणीय आहे.
काय घडलं व्हिडिओत?
सिहीणींच्या शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चागंलाच धुमाकूळ माजवत आहे. व्हिडिओत पाहिले तर दिसते की, एका जिराफाच्या पायांना पकडून सिहींणी त्याच्यावर तुटून पडलेल्या असतात. जिराफ आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो खरा पण यात तो अपयशी ठरतो. जिराफाच्या पायाचा चावा घेत त्या सर्वच त्याला हरवण्याच्या विचारात असतात, ज्यात त्या पुढे जाऊन यशस्वीही होतात. सिंहीणींच्या चाव्यामुळे त्याला प्रचंड वेदना होतात ज्यामुळे तो पळता पळताच खाली पडतोय यानंतर सर्व सिंहीणी त्याच्या अंगावर चढतात आणि मिळून त्याला फस्त करु लागतात. एकट्या सिंहीणीला जिराफाची शिकार करण कठीण होत ज्यामुळे तिघिंनी योजना बनवत एकत्रित त्याच्यावर हल्ला चढवला. एखादी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी एकजूटीची फार गरज असते हे आपल्याला या व्हिडिओतून समजते.
pic.twitter.com/v4d8d3zSJp — Damn Nature You Scary (@AmazingSights) October 4, 2025
चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
सिंहीणींच्या या शिकारीचा व्हिडिओ @AmazingSights नावाच्या इंस्टाग्राम एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “फक्त सिंहच जिराफ आणि मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार करू शकतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एकदा सिंहाने तुमचे पाय धरले की तुमची शिकार झालीच म्हणजे समजा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते क्रूर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.