(फोटो सौजन्य: Instagram)
निसर्गात अनेकदा अशा घटना घडून येत असतात ज्यापासून मानव वंचित आहे. याच घटनांचे व्हिडिओज अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि ते व्हायरलही होतात. आताही असेच काहीसे घडून आले आहे ज्यातील दृश्य लोकांना तुमच्यासाठी वेदनादायी ठरतील. निसर्गाच्या क्रूर नियम कसा एकाच जीव घेतो आणि दुसऱ्याला त्यातून जिवंत राहण्यास मदत करते हे यातून पाहायला मिळेल. प्राणी असो पक्षी असो व मानव… प्रत्येक जीवांमध्ये भावना असतात. कुटुंबाला सांभाळण्याचे त्यांचे पालन पोषण करण्याची काम आई-वडील करत असतात. यात आपल्या मुलांवर कोणताही धोका ओढवला तर आई सर्वात आधी पुढे राहून मुलांची ढाल बनून उभी राहते हेच दृश्य व्हिडिओतही दिसून आले.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक साप एका झाडावर चढून येथे असलेल्या एका घरट्यात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. या घरट्यांमध्ये पक्षी आपली पिल्ले सुरक्षित ठेवतात. अशात या पिल्लांची शिकार करण्याच्या उद्देशानेच साप घरट्यात जाऊ पाहत होता मात्र तितक्यात मागून पिल्लांची आई येते आणि ती सापाला घरट्यात जाताना पाहते. यांनतर व्हिडिओत आपण पाहू शकतो की, पक्षी सापाला रोखण्यासाठी त्याला आपल्या चोचीने मारते मात्र साप काही मागे फिरत नाही ज्यानंतर ती आपल्या चोचीने सापाला पकडते आणि खाली फेकू लागते. पण दुसऱ्याच क्षणी सापही पक्ष्याच्या शरीराभोवती विळखा घालतो ज्यामुळे सापासह पक्षीही खाली जमिनीवर पडतो. शेवटी आपल्याला दोन्ही प्राणी खाली पडल्याचे दिसते आणि यावेळी सापाने पक्ष्याला जोरदार विळखा घातला असतो ज्यातून पक्ष्याचे बाहेर पडणे कठीण होते. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आई आपली जीवाची बाजी लावते आणि हे दृश्य मनाला भावुक करून जाते. तिची हार झाली असली तर आपल्या मुलांच्या वाचण्यात तिने यश मिळवले.
निसर्गात अनेकदा अशा घटना पाहायला मिळतात ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पक्ष्याने आपल्या पिलांना वाचवण्यासाठी एका धोकादायक सापाशी झुंज दिली. ही घटना एका झाडावर बनवलेल्या छिद्राची आहे जी पक्ष्याने घरटे म्हणून तयार केली होती. पण एका सापाने ते घरटे पाहिले आणि त्यात घुसून तळ बनवण्याचा प्रयत्न केला. साप हळूहळू त्या छिद्रात जाऊ लागला आणि कदाचित त्याला वाटले की येथे त्याला सहज शिकार मिळेल.
View this post on Instagram
A post shared by untamedoracircle | Predator vs Prey (@untamedoracircle)
हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक पक्ष्याच्या शौर्याला सलाम करत आहेत. हा व्हिडिओ @untamedoracircle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आईचे प्रेम नेहमीच अतुलनीय असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “परम त्याग” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जगात आईपेक्षा मोठा योद्धा नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.